सातारा

प्रतिवर्षाप्रमाणे बावधनची बगाड यात्रा उत्साहात; प्रशासनाच्या नियमांना ठेंगा

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : तालुक्‍यातील बावधनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण गावाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला आहे. येथील भैरवनाथाच्या यात्रेसाठी होळी पौर्णिमेच्या रात्री मंदिरामध्ये बगाड्या ठरविण्यात येतो. या वेळी संचारबंदीमुळे बगाड्याची निवड झाल्याची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान आज (शु्क्रवार) माेठ्या उत्साहात बगाड यात्रेस प्रारंभ झाला आहे.  
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी बगाड यात्रेला बंदी घालण्यात आली आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून गावात बाधित रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार सध्या गावात बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी व तहसीलदारांनी दिलेल्या अहवालानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, तसेच यात्रेच्या निमित्ताने गावात होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले यांनी गावाचा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत संपर्ण गावात लॉकडाउन राहणार आहे. त्यासाठी गावाचे सर्व सीमा रस्ते सील बंद केले आहेत.

गावातील सर्व अस्थापना व व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. फक्त अत्यावश्‍यक सेवा उदा. दूध, भाजीपाला, किराणामाल, औषधे, खते बी-बियाणे इ. सेवा घरपोच देण्यात येणार आहेत. या सेवा सुरळीत सुरू ठेवणेबाबत ग्रामसमितीने दक्षता घ्यायची आहे. बाधित रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना बाहेर येणे जाणेस प्रतिबंध करण्यात आला असल्याचे आदेशात म्हटले आहे.
 
जिल्हा प्रशासनाने या वर्षी कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी सर्व यात्रा जत्रांवर बंदी घातली आहे. प्रशासनाच्या या भूमिकेला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार रणजित भोसले, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी आवाहन केले आहे. 
सविस्तर वृत्त लवकरच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara: देशात भाजप असताना कॉक्रोच जनता पक्षाची गरज काय? आठवले म्हणाले, राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही

Pandharpur: विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींची झीज, संवर्धनाच्या कामासाठी २३,२४ जूनला दर्शन पूर्ण बंद

Yavatmal: पत्नीसह २ मुलांना विहिरीत ढकललं, नंतर ३५ वर्षीय पतीनं स्वत:लाही संपवलं, यवतमाळ हादरलं

Satara: महायुतीत खदखदीची चर्चा, कऱ्हाडात भाजप प्रदेशाध्यक्षांची बैठक; मित्रपक्षांच्या मंत्र्यांनी फिरवली पाठ

INDW vs PAKW: भारताची टी-२० वर्ल्डकप मोहीम आजपासून; आज भारत-पाक आमनेसामने, कशी असेल Playing 11

SCROLL FOR NEXT