सातारा

Bharat Band Updates : तारळेत बंदला संमिश्र प्रतिसाद; बाजारपेठांत शुकशुकाट

यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (जि. सातारा) : केंद्र सरकारच्या अन्यायकारक शेतकरी कायद्याविरोधात विरोधी पक्ष व शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला तारळे बाजारपेठेत संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

येथील आंबा चौक, बसस्थानक परिसर, घोट रस्त्यावरील दुकाने बंद होती.  शनिवार पेठेतील बहुतांशी दुकाने उघडी होती. येथील महाविकास आघाडी व शेतकरी संघटनांनी पुढे येऊन बंदचे आवाहन केले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास 75 टक्के बाजारपेठ बंद होती. मेडिकल, दवाखाने, किराणा दुकाने, बँका, शासकीय कार्यालये, ही नियमितपणे सुरू होती. एसटी बस फेऱ्याही सुरळीतपणे सुरू होत्या. शेतकरी कायद्याच्या विरोधात कोणत्याही घोषणाबाजी झाली नाही. व्यापा-यांनीच उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग नोंदविला. त्यामुळे बाजरपेठेत बऱ्यापैकी शुकशुकाट जाणवत होता. या बंदच्या पार्श्वभूमीवर भागातील लोकांनी देखील तारळेत न येणेच पसंत केल्याचे पहावयास मिळाले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT