सातारा

Bharat Band Updates : कृषी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक; मल्हारपेठेत कडकडीत बंद

विलास माने

मल्हारपेठ (जि. सातारा) : दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा म्हणून मल्हारपेठ-नवारस्ता बाजारपेठेत शंभर टक्के बंद पाळण्यात आला. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे.  त्यांना पाठिंबा देण्यासाठी व्यापारी असोसिएशनच्या पुढाकाराने मल्हारपेठेतील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तालुक्यातील मोठी बाजारपेठ असल्याने सर्व व्यापारी वर्गांनी पुढाकार घेत शंभर टक्के बंद ठेवण्यात आला.

बाजार समिती कायदा टिकला पाहिजे, शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, तसेच शेतकरी व कामगार विधेयक मागे घेण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कोयनानगर, मोरगिरी, पाटण, ढेबेवाडी, तळमावले, नवारस्ता, मल्हारपेठ या ठिकाणी जाऊन शेतकरी संघटनांच्या पदाधिका-यांनी पाहणी केली असून या बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत, तर कराड-पाटण मार्गावर वाहनाचा शुकशुकाट होता. एस्टी सेवाही बंद होती, त्यामुळे बाहेर गावी जाणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. बाहेरून अवजड वाहतूक करणारे ट्रक ही रस्त्या रस्त्याला थांबलेले दिसून येत होते. दरम्यान, पाटण तालुक्यात शेतकरी आंदोलनास सर्व स्तरातून पाठिंबा मिळाल्याने बंद यशस्वी झाला आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT