Mahabaleshwar Tourism
Mahabaleshwar Tourism esakal
सातारा

महाबळेश्वरला जात असाल, तर ही बातमी आधी वाचा; 'या' कारणामुळं पर्यटकांना सहन करावा लागतोय मनस्ताप!

अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर ते क्षेत्र महाबळेश्वरदरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक लिंगमळामार्गे वळविण्यात आली आहे.

महाबळेश्वर : सलग आलेल्या सुट्यांमुळे व क्षेत्र महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने क्षेत्र महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला. महाबळेश्वर ते क्षेत्र महाबळेश्वर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.

राज्याचे नंदनवन म्हणून महाबळेश्वरची सर्वत्र ओळख आहे. येथील अद्‌भूत निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची महाबळेश्वरला पहिली पसंती असते. सलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी (Mahabaleshwar Tourist) खुलून गेले आहे. महाबळेश्वर ते क्षेत्र महाबळेश्वरदरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक लिंगमळामार्गे वळविण्यात आली आहे. लिंगमळामार्गे रस्ता हा अत्यंत अरुंद व एकेरी आहे.

या रस्त्यावर सहलीच्या गाड्या तसेच मोठ्या गाड्या आल्या की वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे पर्यटकांना एका जागेवर एक ते दोन तास उभे राहावे लागत आहे. आज सकाळपासून या रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा दिसून येत होत्या. प्रशासनाने या वाहतूक कोंडीवर योग्य तो तोडगा काढून पर्यटकांना दिलासा द्यावा, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT