Chhatrapati Sambhajiraje Shivendraraje Bhosale esakal
सातारा

Satara : छत्रपतींबद्दल आदर असता तर संभाजीराजेंना का तिकीट दिलं नाही? शिवेंद्रराजेंचा ठाकरेंना सवाल

'संजय पवार यांना तिकीट देऊन जखमेवर मीठ चोळण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं.'

सकाळ डिजिटल टीम

'तुमचे छत्रपतींच्या घराण्याविषयी किती प्रेम आहे हे दिसते. त्यामुळे या माणसाला घराण्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही.'

सातारा : छत्रपती संभाजीराजेंना (Chhatrapati Sambhajiraje) टाळून संजय पवारांना राज्यसभेचे तिकीट देऊन जखमेवर मीठ चोळण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले होते. त्यामुळे छत्रपतींच्या घराण्याविषयी त्यांचे किती प्रेम आहे हे दिसते, असा घणाघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.

संजय राऊत यांना आमच्या घराण्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही. भाजपवर निशाणा साधण्यासाठी साताऱ्यात आल्यावर आमच्या राजघराण्यावर ते बोलत असून, यातून कार्यकर्त्यांच्या भावनांना हात घालून राजकीय पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीकाही शिवेंद्रसिंहराजेंनी (Shivendraraje Bhosale) केली.

'जखमेवर मीठ चोळण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं'

साताऱ्यात शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि छत्रपती घराण्यावर टीका केली होती. त्याला शिवेंद्रसिंहराजेंनी प्रतिउत्तर दिले आहे. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘छत्रपतींबद्दल संजय राऊत आणि उद्धव साहेबांची शिवसेना (Shiv Sena) यांना आदर असता तर कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभेचे तिकीट का दिले नाही. तो मान सन्मान ठेवायचा होता. संजय पवार यांना तिकीट देऊन जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. यातूनच तुमचे छत्रपतींच्या घराण्याविषयी किती प्रेम आहे हे दिसते. त्यामुळे या माणसाला घराण्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही.’’

'राऊतांच्या वक्तव्याला कोणी महत्त्व देत नाही'

त्यांनी राजघराण्यावर बोलणे टाळावे. यापूर्वीची त्यांची वक्तव्ये काय होती, हे सर्वांना माहीत आहेत. भाजपवर निशाणा साधायचा असेल तर आमच्यावर बोलायचे. साताऱ्यात आल्यावर राजघराण्यावर बोलायचे आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी भडक बोलायचे, हा त्यांचा उद्देश आहे. आता संजय राऊतांच्या वक्तव्याला कोणी महत्त्व देत नाही, असंही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Pune News : महापौर बंगल्याच्या नामांतरावरून आजीमाजी महापौर आमनेसामने

Velhe Crime : राजगड तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस अटक, पोक्सोचा गुन्हा दाखल

Biogas Project : बायोगॅस प्रकल्पासाठी १७० कोटींचा वाढीव खर्च? - ठेकेदाराला दर कमी करण्यासाठी दिले पत्र

Blinkit-Zepto वरून सामान मागवलं... पण मॅन्युफॅक्चरिंग डेटच गायब! आता काय करायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला उपाय

SCROLL FOR NEXT