सातारा

मराठा समाजातील संघटनांत इगाे प्राॅब्लेम : उदयनराजे

सिद्धार्थ लाटकर

सातारा : आरक्षणामुळे माणसे दूरावली जात आहेत. खरं तर गुणवत्तेलाच प्राधान्य दिले पाहिजे असे माझे वैयक्तिक मत असल्याचे खासदार उदयनराजे भाेसले यांनी आज (गुरुवार) येथे व्यक्त केले. त्यामुळेच मी सातारा पालिकेत गुणवत्तेलाच महत्व देत आलाे असून जाती धर्म बाजूला ठेवल्याचे खासदार भाेसलेंनी नमूद केले.

सातारा पालिकेच्या उपाध्यक्षपदी मनाेज शेंडे यांची बिनविराेध झाल्यानंतर खासदार उदयनराजे भाेसले हे पालिका कार्यालयात आले. तेथे त्यांनी उपाध्यक्ष मनाेज शेंडे यांचे अभिनंदन केले. त्यावेळी माजी उपाध्यक्ष किशाेर शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक राजू भाेसले,  नगरसेविका सुजाता राजेमहाडीक, स्मिता घाेडके आदी उपस्थित हाेते. त्यानंतर पत्रकारांनी उदयनराजेंना मराठा आरक्षणासाठी विषयावर छेडले. त्यावर उदयनराजेंनी मी सर्वधर्म, जाती समाज समभाव मानताे. 

राज्यातील मराठा समाजातील संघटनांमध्ये इगाे प्राॅब्लेम असल्याचे उदयनराजेंनी नमूद केले. ते म्हणाले, मी मराठा म्हणून कधी मला संबाेधिले नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्मभावाची शिकवण दिली. तीच आजही अंमलात आणली आहे. माझ्याकडे सर्व जाती धर्माचे लाेक कार्यरत आहेत. लहानपणी गाेट्या, विटया दांडू खेळायचाे तेव्हा तुम्हा पहायचा का हा इथला ताे तिथला... या आरक्षणामुळे लाेक एकमेकांशी बाेलण्याचे बंद झाले. कूठला हा दृष्टीकाेन. मी मनापासून बाेलताे एवढचं.

उदयनराजेंकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट; घेतला महत्वपूर्ण निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT