सातारा

शरद पवार, उद्धव ठाकरेंची बदनामी, कऱ्हाडात अमरावतीच्या दोघांवर गुन्हा

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : सोशल माध्यमावर महाविकास आघाडी सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी केल्याप्रकरणी दोघांवर तालुका पोलिसात सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला. विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक अक्षय शिंदे यांनी त्याची तक्रार दिली आहे. 

आकाश ठाकूर (रा. अमरावती) व रणजीतसिंग राणा अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्यातील सुपने येथील अक्षय शिंदे राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेचे जिल्हा संघटक आहेत. सचिन कुर्‍हाडे पक्षाच्या सोशल माध्यम सेलचे जिल्ह्याचे काम पाहतात. सोशल माध्यमावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारची बदनामी होईल, अशा आशयाच्या पोस्ट व फोटो 12, 15, 16 आणि 19 ऑक्टोबर रोजी टाकले होते. अक्षय यांच्या ते निदर्शनास आले. 

त्यांनी राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष सचिन कुर्‍हाडे यांच्याकडून माहिती घेतली. संबंधित सोशल माध्यमाचा ग्रुप अमरावतीच्या आकाश ठाकूर (रा. अमरावती) यांनी केला आहे, असे स्पष्ट झाले. त्याबाबत अक्षय शिंदे यांनी आकाश ठाकूर व रणजीतसिंग राणा यांच्याविरोधात तालुका पोलिसात तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार गणेश कड तपास करीत आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

Sangli District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत पक्षीय राजकारण नको आमदार जयंत पाटील ; राज्यात दुष्काळ जाहीर करा

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Konkan Railway Debt Repayment : रोहा-वीर दुहेरीकरण ते चिनाब ब्रिजची निर्मिती, कोकण रेल्वेचा 5 वर्षांत कायापालट; 23,500 कोटींचे नवीन प्रकल्प हाती

SCROLL FOR NEXT