Crime News
Crime News esakal
सातारा

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल मालकांसह 11 जणांवर गुन्हा

प्रवीण जाधव

सातारा : कोरोना संसर्गाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector Shekhar Singh) जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. काशीळ (ता. सातारा) येथे हॉटेल अजिंक्यचे मालक अमोल दिलीप कदम (वय २७, रा. काशीळ व रॉयल रेस्टो हॉटेलचे मालक समीर सलीम मुलाणी (वय २५, रा. काशीळ) यांच्यावर बोरगाव पोलिस ठाण्यात (Borgaon Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत हवालदार विजय साळुंखे (Constable Vijay Salunkhe) यांनी फिर्याद दिली आहे. (Case Registered Against 11 Persons For Violating Corona Lockdown Rules In Satara)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

कुशी (ता. सातारा) येथे राजयोग लॉजिंग हे रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्याप्रकरणी अविनाश प्रकाश काळे (वय १९, रा. सरताळे, ता. जावळी), सचिन रामचंद्र माळवदे (वय ४०, रा. नागेवाडी, ता. सातारा) व योगेश बर्गे (रा. अजिंक्यनगर, ता. कोरेगाव) यांच्यावरही तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर बोगदा ते यवतेश्‍वर मार्गावर विनाकारण वाहनातून फिरणाऱ्या सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रेयस सूर्यकांत कदम (वय २२, रा. मंगळवार पेठ), संभाजी रवींद्र पवार (वय ३५, रा. केसरकर कॉलनी), शिवांकुर विजय बगाडे (वय १८, रा. मोरे कॉलनी), योगेश राजेंद्र जाधव (वय २१, रा. मोरे कॉलनी), जोतिबा मोरू पाटील (वय ३४, रा. व्यंकटपुरा पेठ), संदीप तुकाराम पवार (वय ४६, रा. व्यंकटपुरा पेठ) अशी त्यांची नावे आहेत. बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे विनाकारण फिरणाऱ्या आनंद विठ्ठल पोळ (वय ३९, रा. मल्हारपेठ) व जयवंत शिवदास कांबळे यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Case Registered Against 11 Persons For Violating Corona Lockdown Rules In Satara

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT