Udayanraje Bhosale Esakal
सातारा

Satara Police : शिवेंद्रराजेंविरुध्दचा राडा भोवला! खासदार उदयनराजेंसह 45 जणांवर गुन्हा दाखल

कायदेशीर बाजू समजावून सांगूनही उदयनराजे यांनी या जागेत पाय ठेवल्यास खल्लास करीन, अशी धमकी दिली.

सकाळ डिजिटल टीम

विकासाचे काम करून दिले नाही, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली, असेही विक्रम पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraj Bhosale) यांच्यासह समर्थकांमध्ये झालेल्या वादावादीनंतर सातारा शहर पोलीस (Satara Police) ठाण्यात उदयनराजे यांच्यासह 45 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

संशयितांनी जीवे मारण्याची धमकी देऊन दोन लाख रुपये किमतीच्या साहित्याचे नुकसान केले असल्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक विक्रम पवार यांनी तक्ररीत म्हटलंय. दरम्यान, संशयितामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, माजी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा समावेश आहे.

या वादाप्रकरणी बाजार समितीचे अध्यक्ष विक्रम पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटलं आहे, की खासदार उदयनराजे भोसले, विनीत पाटील, अजय मोहिते, सनी भोसले, अमोल तांगडे, पंकज चव्हाण, स्वप्नील घुसाळे, गणेश जाधव, पंकज मिसळ, सतीश माने, अर्चना देशमुख, जितेंद्र खानविलकर, सोमनाथ ऊर्फ काका धुमाळ, अभिजित मोहिते, समीर माने, राहुल गायकवाड, सुभाष मगर, रंजना रावत, किशोर शिंदे, कुणाल चव्हाण.

तसेच नंदकुमार नलवडे, रोहित लाड, युनूस झेंडे, अनिल पिसाळ, काशिनाथ गोरड, शेखर चव्हाण, गीतांजली कदम, अश्‍विनी गुरव, सौरभ सुपेकर, प्रवीण धसके, सुनील काटकर, संदेश कुंजीर, सागर जाधव व दहा ते १५ जण हे बाजार समितीच्या नियोजित बांधकामाच्या ठिकाणी आले. पोलिस असतानाही त्यांनी विकासाच्या कामास विरोध केला.

कायदेशीर बाजू समजावून सांगूनही उदयनराजे यांनी या जागेत पाय ठेवल्यास खल्लास करीन, अशी धमकी दिली, तसेच विकासासाठी ठेवलेला लोखंडी कंटेनर पोकलेनच्या साह्याने तोडफोड करून अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान केले आहे. विकासाचे काम करून दिले नाही, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली, असेही विक्रम पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT