सातारा

बैलगाडी शर्यतीचा शाैक 'त्यांना' नडला, मूलाच्या सांगण्यावरुन गुन्हा नाेंद

सचिन शिंदे

कऱ्हाड : बैलगाडी शर्यतीवर न्यायालयाची बंदी असतानाही आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमाव जमवण्यास बंदी असतानाही बैलगाड्या शर्यतींचे आयोजन करणाऱ्यासह त्यामध्ये सहभागी होणाऱ्या 15 जणांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. येरवळे (ता.कऱ्हाड) येथे पोलिसांनी ही कारवाई केली.
काय सांगता! नाही नाही म्हणता...48 कोटी जमा झाले 

पोलिसांची माहिती अशी : येरवळे येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याची माहिती सातारा पोलिस कंट्रोल रूमवरून शहर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक भरत पाटील यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन याबाबत खात्री केली. त्यावरून येरवळे येथील नदीपात्राच्या जागेत बैलगाडी शर्यत सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमाव जमवण्यास बंदी असतानाही बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने तेथे जमाव जमा झाल्याचे दिसून आले. तसेच तेथे सहा बैलगाड्या थांबल्या होत्या.

श्रीनिवास पाटील म्हणतात, वर्क फ्रॉम होमवाल्यांसाठी 'हे' करा 

नदीपात्रात शर्यतीसाठी चाकोऱ्या पाडल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी छापा टाकला. त्या वेळेला दोन बैलजोड्यांची शर्यत सुरू असताना बैलांना पळवल्याचेही पोलिसांनी पाहिले. दरम्यान, पोलिसांना पाहताच बैलांसह मालक व बैल पळवणारे तेथून पळून गेले. पोलिसांना आखाड्याजवळ एक मुलगा मिळून आला. त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी देवानंद खाडे, श्री. लादे, श्री. काटे यांनी ही कारवाई केली. 

संपादन - सिद्धार्थ लाटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT