Crime News esakal
सातारा

जंबो कोविड रुग्णालयाबाहेर खुनाचा प्रयत्न; साताऱ्यात पाच जणांवर गुन्हा

जंबो कोविड रुग्णालयाबाहेर दोघांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

प्रवीण जाधव

सातारा : येथील जंबो कोविड रुग्णालयाबाहेर दोघांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मनोज बकू मिठापुरे, अनिल बकू मिठापुरे (दोघे रा. मोळाचा ओढा), विक्र टफू मिठापुरे, पप्पू ऊर्फ किरण विक्रम मिठापुरे व अजय विक्रम मिठापुरे (सर्व रा. बेघरवस्ती, रामनगर, ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत सविता प्रकाश काळे (रा. इंदिरानगर, पानमळेवाडी, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. (Case Registered Against Five Persons At Satara Police Station Satara Crime News)

मंगळवारी (ता. 11) रामनगर येथील बेघरवस्तीत झालेल्या मारहाणीबाबत तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याच्या रागातून संशयितांनी दीर एकनाथ व आदिक काळे यांना कोयता, रॉड व लाथा-बुक्‍यांनी मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे सविता यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक पतंगे तपास करत आहेत.

दरम्यान, याच संशयितांनी मारहाण थांबविण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसाला जखमी करून शासकीय कामात अडथळा आणला होता. त्यामुळे संशयितांवर दोन गुन्हे दाखल आहेत. त्यांना तातडीने अटक करण्याचे निर्देश निरीक्षक पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाला दिले होते. त्यानुसार पोलिस त्यांचा शोध घेत होते. दरम्यान, त्यांच्याबाबत हवालदार माने यांना माहिती मिळाली. त्यानुसार हवालदार माने, फडतरे, कुंभार, यादव, पवार, मोहिते यांनी संशयितांना वाढेफाटा येथे सापळा रचून अटक केली.

Case Registered Against Five Persons At Satara Police Station Satara Crime News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT