सातारा

गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींची पुण्यात फसवणूक, साताऱ्यातील एकावर गुन्हा

सिद्धार्थ लाटकर

सातारा : औंध संस्थानच्या सर्वेसर्वाे गायत्रीदेवी पंतप्रतिनीधी यांची पुण्यात फसवणूक झाल्याप्रकरणी चौघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये साता-यातील एकाचा समावेश आहे. मालमत्तेचा बनावट करारनामा करून खोट्या सह्या करत ही फसवणूक झाल्याची नाेंद झाली आहे.

याप्रकरणात शशी शंकर पोडवाल (वय ५१, रा. आळंदी रोड येरवडा), आसिफ जलिल खान (वय ६१, रा. मार्केटयाड), अन्वर युनूस खान पठाण (वय ५४, रा. गोखलेनगर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. गायत्रीदेवी पंतप्रतिनीधी यांचे स्वीयसहायक बलराज अरुण वाडेकर (वय ३७, रा. गुरुवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. बनावट दस्तावेज तयार करुन संबंधितांनी गायत्रीदेवी यांची मालमत्ता विकण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान गायत्रीदेवी यांना हा प्रकार समजला आणि हा प्रकार उघडकीस आला.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी बलराज वाडेकर हे गायत्रीदेवी यांचे स्वीयसहायक आहेत. यामुळे सर्व्हे नंबर ४५८ /१ टिळकरोड, सदाशिव पेठ, पुणे येथील मिळकतीबद्दल
शशी पोडवाल याने मालमत्तेचा पोट भाडेकर आसिफ व अन्वर यांच्याशी संगनमत करून मालमत्तेचा बनावट नोटराईज समझोता करारनामा केला. त्यानंतर गायत्रीदेवी व त्याच्या मुलांचे यावर छायाचित्र लावून खोट्या (बनावट) सह्या केल्या. असे फिर्यादीत देखील नमूद आहे.

पालकमंत्र्यांसह सर्वच झारीतील शुक्राचाऱ्यांनी अगोदर निवडणूक लढवावी : जयकुमार गाेरेंचा 'राष्ट्रवादी'ला टाेला

दरम्यान नोटराईज समझोता करारनामा खोटे आहेत हे गायत्रीदेवी यांचे निकटवर्तीयांना माहिती असताना देखील संबंधितांनी संगनमत करत बनावट दस्ताऐवज तयार करून तो खरा आहे, हे भासवत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत तिघांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.

खंबीर मराठा सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही, उदयनराजेंचा कडक शब्दात रोखठोक इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT