Crime News esakal
सातारा

जम्बो कोविड सेंटरसमोर युवकांत हाणामारी; पोलिस महिलेस जखमी केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

जम्बो कोविड सेंटरसमोर दोन युवकांना मारहाण करताना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिस महिलेस जखमी केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

प्रवीण जाधव

सातारा : येथील जम्बो कोविड सेंटरसमोर दोन युवकांना मारहाण करताना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिस महिलेस (Woman Police) जखमी केल्याप्रकरणी चौघांवर गर्दी, मारामारी व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (Case Registered Against Four Persons At Satara Police Station Satara Crime News)

मनोज मिठापुरे, अनिल मिठापुरे, विक्रम मिठापुरे व अजय मिठापुरे (सर्व रा. मोळाचा ओढा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत हवालदार सुमित्रा किसन डवरे यांनी फिर्याद दिली आहे. काल जम्बो कोविड रुग्णालयाबाहेर चौघे दोन मुलांना मारहाण करत होते. या वेळी सुमित्रा तेथे गेल्या. या वेळी एकाला मारहाण करत असलेल्यांना त्यांनी विचारणा केली. या वेळी तो कोरोनाबाधित आहे; परंतु टेस्टला नकार देत आहे, म्हणून पकडून नेत असल्याचे दोघे म्हणाले.

दुसऱ्याला मारणारे दोघे म्हणाले, ""याने माझ्या बहिणीच्या गळ्यातील सोन्याची साखळी लंपास केली आहे, तो चोर आहे म्हणून त्याला मारत आहोत, असे त्यांनी सांगितले; परंतु दोन्ही जण वेगळेच सांगत होते. त्यामुळे सुमित्रा यांनी मारहाण करू नका, मला चौकशी करायचे आहे, असे सांगितले. तरीही चौघांनी ऐकले नाही. दोघांना माराहण करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी सुमित्रा मध्ये गेल्या. तेव्हा संशयितांच्या दांडक्‍याने त्या जखमी झाल्या. त्यानंतर त्यांनी चौघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक पतंगे तपास करत आहेत.

रुग्णांच्या मदतीसाठी धावली माहेरवाशीन; कोविड रुग्णालयाला 'लाखमोलाची' मदत

Case Registered Against Four Persons At Satara Police Station Satara Crime News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

Sugar Export Ban: निर्यात बंदीमुळे देशातील साखर उद्योगासमोर संकट: हर्षवर्धन पाटील यांची माहिती; आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम होणार!

SCROLL FOR NEXT