सातारा

जावळीत जुगार अड्ड्यावर छापा; पुण्यातील दाेघांसह नऊ जण ताब्यात

प्रवीण जाधव

सातारा : सोमर्डी (ता. जावळी) येथील एका घरामध्ये सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) छापा टाकून नऊ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाईल, तीन दुचाकी असा सुमारे दोन लाख 40 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
 
चंद्रकांत विष्णू सोनवणे (वय 49, रा. सोमर्डी, ता. जावळी), आनंदराव बाबूराव जवळ (वय 50, रा. जवळवाडी, ता. जावळी), संतोष चंद्रकांत वारागडे (वय 48, रा. मेढा, ता. जावळी), प्रमोद दत्तात्रय खटावकर (वय 48, रा. कुडाळ, ता. जावळी), अशोक सोपान चिकणे (वय 49, रा. खंडाळा कन्हेरी, ता. खंडाळा), गणेश दगडू साळवी (वय 39, रा. धनकवडी बालाजीनगर पुणे), राजू विश्वनाथ मंडल (वय 38, रा. बालाजीनगर पुणे), रूपेश तुकाराम साबळे (वय 42, रा. शिवथर, ता. सातारा), दिलीप काशिनाथ कुंभार (वय 53, रा. कुंभारवाढा मेढा, ता. जावळी) अशी त्यांची नावे आहेत.

कारखान्यांमुळे वाहतूक कोंडी; प्रतिनिधींनी तत्काळ पुढाकार घ्यावा, प्रांताधिकाऱ्यांचे आदेश
 
सोमर्डी येथील एका घरामध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने सोमवारी तेथे छापा टाकला. त्या वेळी नऊ जणांना तीन पानी जुगार खेळताना पकडण्यात आले.

सहायक पोलिस निरीक्षक अनसिंग साबळे, हवालदार तानाजी माने, सतीश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, प्रवीण कांबळे, तसेच मेढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने, संजय ओव्हाळ, गजानन तोडकर यांनी ही कारवाई केली.

टपाल खात्यातील पैशावर मलवडीतील दांपत्याचा डल्ला 

Edited By : Siddharth Latkar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee TMC Resignation : ममता बॅनर्जींना तगडा झटका; अत्यंत विश्वासू चंद्रिमा भट्टाचार्य यांनी तृणमूल पक्ष प्रमुख पदाचा दिला राजीनामा

Mumbai News: रेल्वेचे दावे कोरडे, डबे मात्र ओले! लोकलच्या छतातून पाण्याचा वर्षाव; रेल्वे प्रशासनावर टीकेचा भडिमार

आधी गाडण्याची तयारी केली, नंतर पतीची हत्या; ४५ दिवसांनी पत्नीचं कांड समोर

Latest Marathi Live Update: विकेंडला रायगडला जाणार आहात? देवकुंड, ताम्हाणीसह अनेक पर्यटनस्थळांवर लागू झाले कडक निर्बंध

Malvan Teacher Transfer : मालवणमध्ये 5 दिवसांपासून शाळा बंद! चांगल्या शिक्षकाच्या बदलीने पालक संतापले; 'त्या' शिक्षकाला परत रुजू न केल्यास दाखले काढून घेण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT