सातारा

बलात्कार प्रकरणी कोरेगाव तालुक्यात एकास अटक

राहूल लेंभे

पिंपोडे बुद्रुक (जि. काेरेगाव) : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील सोनके गावातील एकाला वाठार पोलिसांनी अटक केली आहे. हिंदुराव मारुती धुमाळ असे आरोपीचे नाव आहे. पिडीत मुलगी तब्बल चार महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर ही माणुसकीला काळिमा फासणारी अमानुष घटना उघडकीस आली असून याबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संबधित मुलगी आपल्या आजीकडे जात असताना आरोपीने तिच्याशी गोड बोलून तिला घरात बोलवले व तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. पाडव्याच्या दुसऱ्या दिवशीही दुपारी दोनच्या सुमारासच आरोपीने त्या मुलीवर बलात्कार केला. 

या घटनेत ही अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिली असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या घटनेला वाचा फुटली. याबाबत मुलीच्या आईने शनिवारी (ता. 11) वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एम.एस.पाटील पुढील तपास करत आहेत.

संपादन - सिद्धार्थ लाटकर

'या' जिल्ह्यात खासगी रुग्णालय, मोठ्या शाळा, महाविद्यालयांचा 'या' साठी शाेध सुरु 

बेरोजगार आहात? काळजी करू नका, प्रशिक्षणादरम्यान मिळणार पगार अन्‌ त्यानंतर नोकरीची हमी! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT