सातारा

शेतकरी हतबल; साता-यात एक लाख 70 हजार रुपयांच्या उसाची चाेरी

प्रवीण जाधव

सातारा : जिहे (ता. सातारा) येथील विजयनगर परिसरात असणाऱ्या शेतातील एक लाख 70 हजार रुपये किमतीचा ऊस चोरून नेल्याप्रकरणी विजयनगर येथील धर्मू खाशाबा सरडे (रा. आकले, ता. सातारा) यांनी तिघांच्या विराेधात फिर्याद दिली आहे.

आम्ही दहा तारखेस प्रतापगडावर हाेताे. तेथे एका कार्यक्रमा निमित्त आम्ही सर्वजण तेथे गेलाे हाेताे. आम्हांला तेथे समजले तुमच्या उसाला ताेड लागली आहे. हा प्रकार माझ्या वाटेक-यास त्रास देण्यासाठी घडला आहे. मी संशियतांविराेधात तक्रार दिली आहे असे धर्मू यांनी सांगितले.

संबंधितांनी मला शेती भाडेतत्वावर मागितली हाेती. परंतु मी दिली नाही. माझे सहकारी हे अन्य समाजातील आहेत. त्यांचा उदरनिर्वाह चालावा यासाठी मी त्यांच्यासमवेत भागिदारी करुन शेती करीत आहे. यापुर्वीच्या रागातून संबंधितांनी हा प्रकार केल्याचे सरडे यांनी नमूद केले. 

दरम्यान या प्रकरणी विजयनगर येथील अशोक श्रीरंग घोरपडे, दत्तात्रय श्रीरंग घोरपडे, रावसाहेब दत्तात्रय तरडे यांच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या तिघांनी ता. दहा नोव्हेंबर रोजी ऊस चोरून नेल्याचे धर्मू खाशाबा सरडे (रा. आकले, ता. सातारा) यांनी नोंदविलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार राऊत तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT