Fake signature
Fake signature esakal
सातारा

बनावट स्वाक्षऱ्या करून व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक

सचिन शिंदे, हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : हॉटेलची (Hotel) देखरेख करणाऱ्या दोघांनी धनादेशावर बनावट स्वाक्षऱ्या (Fake signature) करून हॉटेल व्यावसायिकाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना आज उघडकीस आली. उमेश चंदवाणी यांनी पोलिसात (Karad Police Station) फिर्याद दिली आहे. त्याप्रकरणी अनिल व सुनील गोपीचंद बसंतानी (रा. मलकापूर) अशा दोन भावांवर गुन्हा नोंद झाला आहे. (Case Registered Against Two Brothers At Karad Police Station In A Fake Signature Case Satara Crime News)

हॉटेलची देखरेख करणाऱ्या दोघांनी धनादेशावर बनावट स्वाक्षऱ्या करून हॉटेल व्यावसायिकाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चंदवाणी व गणेश जाधव यांनी एकत्रित ताईगडेवाडी येथे जे. सी. लिकर्स व्यवसाय सुरू केला. त्यासाठी कलाप्पाअण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या येथील शाखेत जे. सी. लिकर्स नावाने खाते चालू केले. त्या खात्यावर व्यवहाराचे अधिकार उमेश व गणेश यांनाच होते. चंदवाणींनी अनिल व सुनील यांना लिकर्सच्या देखरेखीचे काम दिले होते.

व्यवसायातून खरेदी केलेल्या मिळकतीबाबत वाटणीच्या कारणावरून अनिल, सुनील व फिर्यादीत तीन वर्षांपासून वाद असल्याने एकत्रित व्यवसाय करणे बंद करून त्याची समान वाटणी करण्याचे ठरले होते. मात्र, त्यानंतर अनिल व सुनील यांनी समान वाटपपत्र करून देण्यास टाळाटाळ केली. २०१९ मध्ये चंदवाणीने पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर खातेसंबंधी कागदांची मागणी केली. त्यावेळी अनिल व सुनील यांनी अनधिकृतरित्या संमतीशिवाय २०१८ पासून आजपर्यंत बनावट सह्या करून धनादेशाव्दारे लाखो रुपये काढल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Case Registered Against Two Brothers At Karad Police Station In A Fake Signature Case Satara Crime News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT