सातारा

कोट्यवधींचे कर्ज देण्याचे आमिष दाखविणाऱ्या पुणे, उस्मानाबाद जिल्ह्यांतील दोघांवर फसवणुकीचा साताऱ्यात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कंपनीसाठी एक कोटी 68 लाख रुपये कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून दोन लाख 29 हजार 279 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित अमरसिंग परदेशी (रा. चांभारवाडा, दौंड, जि. पुणे) व मनोहर औदुंबर भारती (रा. पागारदरवाडी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत प्रतिभा चंद्रकांत पवार (वय 33, रा. गोरखपूर, पिरवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची शेरेचीवाडी (ता. फलटण) येथे मोरया पॅकेजिंग इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. या कंपनीसाठी एक कोटी 68 लाख रुपये कर्ज मंजूर करण्याचे आमिष दोघांनी त्यांना दाखविले होते. कर्ज रक्कम वितरित करण्यासाठी म्हणून त्यांनी लॉग इन चार्जेस, प्रोसेसिंग फी, व्हॅल्युएशन रिपोर्ट अशा विविध कारणांसाठी त्यांनी त्यांच्याकडून दोन लाख 29 हजार 279 रुपये घेतले होते. तरीही कर्ज न देता त्यांनी फसवणूक केल्याचे प्रतिभा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. उपनिरीक्षक एम. के. कदम तपास करत आहेत. 

यंदा ना वाहनांचे कर्कश हॉर्न, ना पोलिसांच्या शिट्ट्या 

कऱ्हाड : केबल चॅनेलद्वारे ज्ञानदान, पालिका शाळा क्रमांक तीनच्या प्रयत्नास यश

अरे बापरे... या वाडीत गांजाची शेती 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या मंत्रिमंडळात कोण इन, कोण आउट? संभाव्य यादी समोर; महाराष्ट्रातूनही 'हे' नाव चर्चेत, धर्मेंद्र प्रधानांचं खातं कुणाला?

Chhatrapati Sambhajinagar: घाटीची वाटचाल कॉर्पोरेटकडे ; १७ वर्षांनंतर ट्रॉमा आयसीयूचा कायापालट; वॉर्ड २९ चे लोकार्पण

Satyajeet Tambe: पेपरफुटीने महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेचा बुरखा फाडला: आमदार सत्यजित तांबे; ४ लाख २८ हजारांहून उमेदवारांवर अन्याय

Latest Marathi News Update : खिद्रापूरमध्ये कोपेश्वर मंदिर बंद; अतिक्रमण वादावर ग्रामस्थांचे साखळी उपोषण

Sankashti Chaturthi : श्रीगणेश उपासना, वटवृक्ष आणि आत्मचैतन्याचा जीवनसाधनेशी असलेला गूढ संबंध

SCROLL FOR NEXT