सातारा

सावधान, जशी फलटणला झाली तशी तुमचीही फसवणूक व्हायला वेळ लागणार नाही

किरण बोळे

फलटण शहर (जि.सातारा) : मी फोन पे कस्टमर केअरमधून बोलत असून, तुम्हाला पैसे रिफंड करायचे आहेत, असे सांगून फोन पे नोटिफिकेशनमध्ये लिंक पाठवून केलेल्या ट्रांजेक्‍शनमध्ये 66 हजार 700 रुपयांची एकाची फसवणूक करण्यात आली आहे.
 
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, राजगौरी शशिकांत कदम (रा. लक्ष्मीनगर फलटण) यांची 27 जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान लक्ष्मीनगर येथे ऑनलाइन फसवणूक झाली आहे. राजगौरी कदम घरी असताना त्यांना एक फोन आला. कदम यांच्या मोबाइल नंबरवर अज्ञाताने त्याचा मोबाइलवरून फोन करून मी फोन पे कस्टमर केअरमधून बोलतोय, तुमचे 4200 रुपये रिफंड होणार आहेत. ते तुम्हाला हवे आहेत का नको? असे म्हणून फिर्यादी यांचे फोन पे नोटिफिकेशनमध्ये लिंक पाठवली. 

एरवी थंड असलेले महाबळेश्वर अचानक तापले, नेमकं काय झाले रात्री वाचा सविस्तर

आठ किलोमीटर पायपीट करणाऱ्या लक्ष्मीचा शाळेत पहिला नंबर; सैन्यात जाण्याचे स्वप्न 

त्यानंतर त्या लिंकच्या माध्यमातून दहा वेळा ट्रांजेक्‍शन करून कदम यांच्या अकाउंटमधून 66 हजार 700 रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद त्यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रताप पोमण करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Girish Mahajan : "भाजपला कुबड्यांची गरज नाही"; नाशिकमध्ये महायुतीच्या चर्चेला गिरीश महाजनांचा पूर्णविराम

TMT Bus: ज्येष्ठांसाठी डिजिटल बस पास, टीएमटीची नवी योजना; कालमर्यादेमुळे डोकेदुखी

अ‍ॅपलच्या ४२ हजारांच्या चेकला २० कोटींची बोली, हा चेक म्हणजे कंपनीचं 'बर्थ सर्टिफिकेट'

Instagram News : इंस्टाग्राम गुपचुप ऐकतंय तुमचं बोलणं? बंद करा 'ही' 1 सेटिंग नाहीतर होईल नुकसान..कंपनीच्या हेडनी स्पष्टच सांगितलं

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT