सातारा

''हिंदुत्वाच्या प्रश्‍नावर भाजप आणि सेनेत हा फरक आहे''

सिद्धार्थ लाटकर

सातारा : शिवगान स्पर्धेमुळे शिवरायांच्या शौर्य, धैर्य, पराक्रम, बुध्दीचातुर्य, स्वयंशिस्त आदी गुणांचा प्रसार होऊन, ते अंगिकारण्याची जाणीव जागृती झाली आहे. स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मी भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठच्या सर्वांचे अभिनंदन करतो, असे उद्‌गार खासदार उदयनराजे भोसले यांनी काढले. शिवगान स्पर्धेच्या समारोपप्रसंगी खासदार भोसले बोलत होते. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक सेलचे राज्य संयोजक शैलेश गोजमगुंडे, माजी आमदार कांताताई नलावडे, भरत पाटील, लक्ष्मण सावजी, उपाध्यक्ष पंकज चव्हाण, नंदेश उमप, विसू बापट, विनिता जोशी आदी उपस्थित होते. 

भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील म्हणाले, ""शिवसेनेचे मुख्यमंत्री असलेल्या या आघाडी सरकारने महाराष्ट्रात आजान स्पर्धा आयोजित केली, तथापि भाजपने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुणगान गाणारी शिवगान स्पर्धा आयोजित केली.'' हिंदुत्वाच्या प्रश्‍नावर भाजप आणि शिवसेनेमध्ये हा फरक आहे. हिंदू या शब्दातच सर्वधर्मसमभाव व्यापल्याचे त्यांनी सांगितले. शैलेश गोजमगुंडे यांनी मनोगत व्यक्‍त केले. स्पर्धेचे परीक्षक नंदेश उमप यांनी शिवरायांवरील पोवाडा तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात विनिता जोशी यांनी आरती सादर केली. 

शिवगान समूह गायन स्पर्धेत पनवेल येथील सामगंध कला केंद्र प्रथम, बीड येथील शिवकल्याण राजा संघाने व्दितीय, जळगाव येथील मुळजी जेठा महाविद्यालयाने तृतीय क्रमांकाचे, तर उत्तेजनार्थ सांगली येथील गंधर्व पृथ्वीराज माळी, ठाणे येथील स्वरश्री संघाला विभागून देण्यात आले. वैयक्‍तिक प्रकारांत नाशिकची नेहा मूर्ती प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे रत्नागिरी येथील आदित्य लिमये आणि नागपूर येथील आकांक्षा चारभाई यांना देण्यात आला तर उत्तेजनार्थ नागपूरच्या आश्‍लेशा कुलकर्णी यांना तर जालना येथील सई ठकार यांना देण्यात आला. याचबरोबर वैयक्‍तिक पाच विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात आली.

असा बनवा शाही काजू हलवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिरासह 'ही' प्रसिद्ध मंदिरे बंद राहणार; कधी आणि का? जाणून घ्या वेळ

T20 WC, IND vs WI : विंडीजचे दोन्ही सलामीवीर एकाच दिशेने पळाले, पुढे काय घडले? बसणार नाही विश्वास, अर्शदीप सिंग स्टम्पकडे पळाला अन्...

Viral Video : मुलाने आईला पहिल्यांदाच घडवला विमान प्रवास, विंडो सीटवरून नजारा पाहताना पाणावले डोळे, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

Numerology News : 'या' जन्मतारखेवर जन्मलेल्या सुना असतात साक्षात लक्ष्मीचं रूप; नाराज कराल तर येईल गरिबी !

Navi Mumbai Crime: अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू, नवी मुंबईतील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकळले; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT