Officer Abhijit Bapat esakal
सातारा

साताऱ्याच्या आरोग्य अधिकाऱ्यानंतर मुख्‍याधिकाऱ्यांची पिंपरी चिंचवडला बदली

उमेश बांबरे

सातारा : कालच आरोग्य अधिकाऱ्यांची रत्नागिरीला बदली झाल्यानंतर आज सातारा नगरपालिकेचे मुख्‍याधिकारी अभिजित बापट (Chief Officer Abhijit Bapat) यांची बदली झाली असून त्‍यांच्‍याकडे पदोन्नतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्‍या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) उपायुक्‍तपदाची जबाबदारी सोपविण्‍यात आली आहे. सातारा पालिकेचे मुख्‍याधिकारी म्‍हणून अभिजित बापट यांनी यापूर्वी कामकाज केले होते. (Chief Minister Abhijit Bapat Transferred To Pimpri Chinchwad Satara Marathi News)

कालच आरोग्य अधिकाऱ्यांची रत्नागिरीला बदली झाल्यानंतर आज सातारा नगरपालिकेचे मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांचीही बदली झाली आहे.

कार्यकाळ पूर्ण झाल्‍यानंतर बापट यांची पंढरपूर पालिकेच्‍या (Pandharpur Municipality) मुख्‍याधिकारीपदी बदली करण्‍यात आली. बापट यांच्‍या बदलीमुळे रिक्‍त झालेल्‍या जागी शासनाने शंकर गोरे यांची नियुक्‍ती केली. गोरे यांच्‍या बदलीनंतर सातारा जिल्‍हाधिकारी कार्यालयात नगरपालिका कक्षाचे प्रमुख म्हणून कार्यरत असणाऱ्या बापट यांच्‍याकडे पुन्‍हा सातारा पालिकेच्‍या मुख्‍याधिकारीपदाची सूत्रे सोपविण्‍यात आली.

बापट यांनी सूत्रे स्‍वीकारल्‍यानंतर शहराच्‍या विकासासाठीच्‍या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. बापटांची नगरविकास विभागाने काल रात्री एका आदेशानुसार बदली केली. बापट यांच्‍याकडे पदोन्नतीने पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्‍या उपायुक्‍तपदाची जबाबदारी सोपविण्‍यात आली असून बापट यांच्‍या बदलीमुळे रिक्‍त झालेल्‍या सातारा पालिकेच्‍या मुख्‍याधिकारीपदी कोणाची वर्णी लागते, याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे. कालच साताऱ्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांची बदली रत्नागिरीला होती.

Chief Minister Abhijit Bapat Transferred To Pimpri Chinchwad Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : वर्ध्यात भटक्या कुत्र्याचा हैदोस, दिवसभरात तब्बल १९ जणांना चावा

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT