सातारा

Breaking News : महावितरणच्या कर्मचा-यास चाेपले; पाेलिस तपास सुरु आहे

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सध्या वीजबिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच सातारा जिल्ह्यात थकीत ग्राहकांचे कनेक्‍शन ताेडण्याची कार्यवाही महावितरणकडून करण्यात येत आहे. दरम्यान ही कारवाई करताना महावितरणच्या कर्मचा-यांवर हल्ले हाेत आहेत.

काही दिवसांपुर्वी पूसेगाव येथे शिवसैनिकांनी वसूली अधिका-यांची गाडी फाेडली. आज (बुधवार) सातारा शहरानजीकच्या करंजे येथे दाेन कर्मचा-यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक तपशील समजू शकला नाही. परंतु संबंधित कर्मचारी हे बाबर काॅलनी येथे थकीत रक्कमेच्या वसूलीसाठी गेले हाेते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. या घटनेची नाेंद घेण्याचे काम शाहूपूरी पाेलिस स्टेशनला सुरु हाेते.

जनतेच्या घरातील अंधार दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन; वंचितचा इशारा

दरम्यान महावितरणने ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी किमान दोन दिवसांची मुदत द्यावी. सध्याची ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती पाहता राज्य सरकारने दुष्काळी भागातील वीजतोडणीबाबत वेगळा निकष लावून दुष्काळी भागातील जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी नुकतीच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रताप जाधव यांनी केली आहे. 

कोरोनामुळे ग्रामीण व शहरी भागातील सर्वच नागरिक त्रस्त आहेत. अशा स्थितीत वीज जोडणी अत्यावश्‍यक आहे; पण वीजबिलांच्या थकबाकीमुळे कनेक्‍शन तोडण्याची कारवाई वीज कंपनीकडून होत आहे. वीज कंपनीने आजपर्यंत चांगले काम केलेले असताना आता कनेक्‍शन तोडण्याचा प्रकार निश्‍चितच वेदनादायी आहे. त्यामुळे थकबाकीबाबत टप्प्याटप्प्याने रक्‍कम भरण्याचा निर्णय घेऊन कंपनीने महामारीने त्रस्त जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी वीज वितरण कंपनीला नुकताच दिला आहे. 

घरपट्टी माफीचा प्रस्ताव शासनाने फेटाळाल्यास असा हाेईल सातारकरांचा ताेटा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT