सातारा

कऱ्हाड, पुणे, सांगलीतून दुचाकी चोरणाऱ्याला अटक; सातारा पोलिसांकडून दहा दुचाकी हस्तगत

प्रवीण जाधव

सातारा : शहरासह कऱ्हाड, पुणे व सांगली येथून दुचाकी चोरणाऱ्या एकाला शहर पोलिसांनी अटक केली आहे, तर एक अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. 

विकास मुरलीधर मुळे (रा. मंगळवार पेठ, सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. काल शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक शहरात गस्त घालत होते. या वेळी सदरबझार परिसरात दोघे संशयित दोन दुचाकी घेऊन थांबले असल्याची माहिती पथकाला मिळाली. या पथकाला चर्चजवळ हे दोघे आढळून आले. चौकशीमध्ये त्यांना दुचाकींची कागदपत्रे देता आली नाहीत. कसून चौकशीत त्यांनी सातारा, कऱ्हाड, सांगली व पुणे परिसरातून चोरी केल्याचे सांगितले. 

त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून दहा दुचाकी हस्तगत केल्या. या कारवाईतून शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेले दुचाकीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक नानासाहेब कदम, हवालदार प्रशांत शेवाळे, गुलाब जाधव, अविनाश चव्हाण, चंद्रकांत भोसले, विजय गायकवाड, गणेश घाडगे, अभय साबळे यांनी ही कारवाई केली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT