Modi government esakal
सातारा

मोदी हटाव, देश बचाओ..; 'भारत बंद'ला साताऱ्यात संमिश्र प्रतिसाद

उमेश बांबरे

देशात तीन वादग्रस्त कृषी कायदे शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न सुरु आहे.

सातारा : शेतकरी विरोधी कायदे रद्द (Agricultural Act) करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार विरोधी श्रमसंहिता रद्द करा, शेतीमालाला हमीभाव कायदा करावा व इंधनाची महागाई कमी करावी, या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चा समर्थन समितीने पुकारलेल्या भारत बंदला साताऱ्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. आज संयुक्त किसान मोर्चा (Sanyukta Kisan Morcha) व काँग्रेसने (Congress Party) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत मोदी हटाव, देश बचाओ..चा नारा दिला.

यावेळी काँग्रेस व संयुक्त किसान मोर्चा समितीच्या वतीने झालेल्या आंदोलनात चले जाओ, चले जाओ.. मोदी सरकार चले जाओ, शेतकरी कामगार एकजुटीचा विजय असो..., मोदी हटाव, देश बचाओ... अशी घोषणबाजी करत शेतकरी व कामगार विरोधातील काळ्या कायद्याला विरोध व इंधनाची कृत्रिम टंचाई निर्माण करून महागाई वाढविणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. संयुक्त किसान मोर्चात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, शेतकरी कामगार पक्ष, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, कामगार शेतकरी संघर्ष समिती, लाल निशाण पक्ष, काँग्रेस पक्ष, डी. वाय. एफ.आय. युवक संघटना, एसएफआय, बळीराजा शेतकरी संघटना, अंगणवाडी व आशा संघटना, एम.एस. एम. आर.ए. युनियन, विमा कर्मचारी संघटना, आयटक, शहर सुधार समिती, भाकप या संघटना व पक्ष सहभागी झाले होते.

Sanyukta Kisan Morcha

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात किसान मोर्चाने म्हटले, की देशात तीन वादग्रस्त कृषी कायदे शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न सुरु आहे. या कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने आज भारत बंदची हाक दिली होती. त्यास सातारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, किसान मोर्चात समाविष्ट पक्ष व संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार विरोधी श्रमसंहिता रद्द करा, शेतीमालाच्या हमीभावाचा कायदा करावा, इंधनासह इतर सर्व प्रकारची महागाई कमी करावी, कार्पोरेट कंपन्यांना देश विकणे बंद करा, राष्ट्रीय ऐक्य भारतीय संविधानाचे रक्षण करावे या मागण्या करण्यात आल्या आहेत. या वेळी माणिक अवघडे, अशोक यादव, ॲड. भाई समीर देसाई, विजय मांडके, अस्लम तडसरकर, विजय निकम, डॉ. सुरेश जाधव, मिनाज सय्यद, संजय कांबळे, साजिद मुल्ला, आनंदी आवघडे, मिलिंद मनोहर, वसंत नलावडे, चैतन्य दळवी, ज्ञानेश्वर कदम, ॲड. शौकत पठाण, विक्रांत पवार, शिवाजी पवार, बाबूराव शिंदे, राजेंद्र शेलार, रजनी पवार, मालन परळकर, अमर करंजे, आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT