सातारा

जिल्हा कारागृह परिसरात बांधकाम निर्बंध शिथिल; शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

गिरीश चव्हाण

सातारा : सातारा जिल्हा कारागृह परिसरातील नवीन बांधकामासाठी असणारे निर्बंध शिथिल करण्यात आले असून, त्याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाठपुरावा केला होता. याबाबतचा निर्णय घेतल्याने शिवेंद्रसिंहराजेंनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आभार मानले आहेत. 

साताऱ्याच्या मध्यवर्ती भागात जिल्हा कारागृह आहे. कारागृहाच्या पाचशे मीटर परिसरात बांधकामास मज्जाव होता. या बांधकाम नियमावलीमुळे शहराच्या विकासावर परिणाम होत होता. हे निर्बंध शिथिल करण्यासाठी आमदार भोसले यांनी काही दिवसांपूर्वी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या दालनात संबंधित नगरविकासमंत्री, तसेच इतर संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. बैठकीत बांधकाम नियमावलीत शिथिलता आणण्याचा निर्णय झाला होता. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाशीसुद्धा संपर्क साधण्यात आला होता. 

यानुसार बांधकाम नियमावलीत शिथिलता करत त्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. यानुसार जिल्हाधिकारी सिंह यांनी कारागृह परिसरातील बांधकामासाठीच्या नियमावलीत शिथिलता आणली आहे. यामुळे या परिसरातील विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. पालिका प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे. सातारकरांच्या विकासातील मोठी समस्या दूर केल्याबद्दल नागरिकांच्या वतीने शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

आजचे राशिभविष्य - 17 मे 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मे 2026

New Marathi Books Review : वाचनीय आणि संग्रहणीय! अध्यात्मापासून ते पर्यटनाच्या अनुभूतीपर्यंत, नव्या पुस्तकांची रंजक सफर

साप्ताहिक राशिभविष्य : (१७ मे २०२६ ते २३ मे २०२६)

SCROLL FOR NEXT