सातारा

पोलिस दाम्पत्याची जाबाज कामगिरी, कोरोनावर ठरली भारी!

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : अंग दुखणे, ताप, थंडी वाजणे असा प्रकार आठवडाभर सुरूच होता. ताप येणे थांबलेच नाही. त्यामुळे कोरोनाची तपासणी केली, ती टेस्ट पॉझिटिव्ह आली. दोन सप्टेंबरला थेट कृष्णा रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी पती सचिन साळुंखे हेही कोरोनाबाधित आहेत, असा अहवाल आला. त्यांना फारसा त्रास नव्हता. त्यांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला. मी रुग्णालयात व पती घरात अशी स्थिती होती. त्यामध्ये समन्वय ठेवल्याने दोघांनीही एकाच वेळी कोरोनावर मात केली असल्याचे सपना सचिन साळुंखे यांनी सांगितले.

कोरोनाच्या काळात कृष्णा रुग्णालयात औषधोपचार केले. इंजेक्‍शन घेण्याची स्थिती निर्माण झाली. मात्र, त्यावेळी धीर सोडला नाही. त्यामुळे त्या स्थितीवरही खंबीरपणे मात केली. कृष्णा रुग्णालयात असताना सकस आहार व नियमित व्यायामावर भर दिला. नियमित व्यायाम करताना योगा महत्त्वाचा ठरला. त्यात प्राणायाम करून श्वास घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले. त्याच पद्धतीने फोनवरून पती सचिन साळुंखे यांचीही सातत्याने चौकशी करत होते. त्यांनाही व्यायाम, सकस आहारावर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडले. दिवसभर बसून राहायचे. सकाळी नाश्‍ता, दुपारी जेवण, पुन्हा सायंकाळी नाश्‍ता, रात्री जेवण असा दिनक्रम होता. 

पहाटे उठून प्राणायाम केल्याने अधिक फायदा झाला. तर जेवणात सकस आहार महत्त्वाचा ठरला. 14 दिवसांनी कोरोनावर मात करून घरी आले. मात्र, त्यानंतरही सलग दहा दिवस घरात राहून शरीरातील प्रतिकारक्षमता वाढवली. पती सचिन यांनाही त्यासाठी तयार केले. दोघांचा समन्वय, नियमित औषधे, व्यायाम अन्‌ सकस आहार हेच अत्यंत महत्त्वाचे ठरल्याने केवळ वीस दिवसांत कोरोनावर मात करून काही दिवसात पुन्हा पोलिस खाते दोघानींही जॉईन केले. कोरोनाची नाहक भीती, त्याचा तणाव घेऊ नका, त्याला धीराने, धाडसाने सामोरे जाण्याची तयारी ठेवा, निश्‍चित कोरोना हरतो अन्‌ आपण जिंकतोच. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात संतापजनक घटना! धावत्या कारमध्ये वकील महिलेवर अत्याचार, नेमकं काय घडलं?

CSK vs SRH: 'Dhoni चेन्नईत सामना खेळणार नाही, कारण...', सुनील गावसकरांनी स्पष्टच सांगितलं; पण चाहते होतील नाराज

Latest Marathi News Live Update : रत्नागिरीत पेट्रोल-डिझेल सोबत आता CNG चा तुटवडा

पायात काटा घुसला आणि संवेदना गायब, देऊळ बंद 2 च्या शूटिंग दरम्यान 4 महिने बेडरेस्टवर होते मोहन जोशी

Vaibhav Sooryavanshi चे वय विसरा, त्याला थेट टीम इंडियात घ्या.... रवी शास्त्रींची BCCI कडे थेट मागणी

SCROLL FOR NEXT