सातारा

कोरोना चाचणीनंतर शाळेची घंटा; आजपासून शिक्षकांची कोरोना तपासणी

अंकुश चव्हाण

कलेढोण (जि. सातारा) : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा येत्या 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. याबाबत दहा नोव्हेंबर रोजी शासनाने निर्णय घेतला आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू करताना दिलेल्या मार्गदर्शक सूचनेत इयत्ता नववी ते 12 वीपर्यंत शिकविणारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असून, सातारा जिल्हा परिषद व आरोग्य विभागाने अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. त्यानुसार आज मंगळवारपासून (ता. 17) ते 22 नोव्हेंबरअखेर आरोग्य विभागामार्फत कोरोना चाचण्या होणार आहेत. 

कोरोना काळात बंद असलेली ज्ञानमंदिरे 23 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहा नोव्हेंबर रोजी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शाळा सुरू करण्यापूर्वी इयत्ता नववी ते बारावीअखेर शिकविणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शाळेत हजर राहण्यापूर्वी कोरोना चाचणी केल्याबाबत शाळा व्यवस्थापनास समितीस प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. कोरोना चाचणीत जे कर्मचारी बाधित असतील त्यांनी डॉक्‍टरांनी प्रमाणित केल्यानंतर शाळेत हजर राहावयाचे आहे. त्यासाठी सातारा जिल्हा परिषद व आरोग्य विभागाने पाऊल उचलली आहेत. 

सातारा जिल्हा परिषदेने कोरोना चाचणीबाबत नुकताच तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना आदेश काढला आहे. त्यानुसार शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 17 ते 22 नोव्हेंबरअखेर कोविड चाचणी करण्याचे बंधनकारक केले आहे. ही चाचणी जिल्ह्यातील सर्वसाधारण रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, 
कोविड केअर सेंटर व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी मोफत होणार आहे. सदरचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर शिक्षकांना शाळेत रुजू होता येणार आहे. शाळा सुरू करताना दहा नोव्हेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार शाळा स्वच्छता व निर्जंतुक करणे, शिक्षकांची कोरोना तपासणी करणे, एका बाकावर एक विद्यार्थी, शारीरिक अंतरासाठी चिन्हांचा वापर, शालेय कार्यक्रम आयोजनावर पूर्ण बंदी, पालकांची लेखी संमती घेणे, अध्यापनात विद्यार्थ्यांची 50 टक्के प्रत्यक्ष हजेरी, तर 50 टक्के ऑनलाइन हजेरी आदी नियमांची अंमलबजावणी करावी लागणार आहे.

शिक्षकांच्या तपासणीबाबत जिल्हा आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले. त्यानुसार आज मंगळपासून (ता. 17) शिक्षकांच्या मोफत कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत. 
-डॉ. सुशील तुरुकमाने, वैद्यकीय अधिकारी, मायणी 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT