Covishield Vaccine esakal
सातारा

Don't Worry : जिल्ह्यात 'कोव्हिशिल्ड'चे 50 हजार डोस उपलब्ध

लसीकरण मोहिमेला आजपासून येणार वेग

प्रशांत घाडगे

सातारा : जिल्ह्याला गेल्या चार दिवसांपासून लस उपलब्ध न झाल्याने बहुतांश केंद्रे बंद होती. मात्र, आज जिल्ह्यात कोव्हिशिल्ड लशीचे (Covishield Vaccine) सुमारे ५० हजार डोस उपलब्ध झाल्याने लसीकरण मोहीम (Vaccination campaign) पुन्हा वेग घेईल. जिल्हा रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालय (Rural Hospital), प्राथमिक आरोग्य केंद्रात लशींचे वाटप करण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम एक जानेवारीपासून सुरू झाली आहे.

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम एक जानेवारीपासून सुरू झाली. सुरुवातीला लशीचे डोस मोठ्या संख्येने उपलब्ध झाल्याने एकाच दिवसात ५० हजारांहून अधिक लसीकरण झाले होते. मात्र, मागील काही दिवसांत जिल्ह्याला लशीचे अल्प डोस उपलब्ध होत असल्याने मोहीम मंदावल्याचे दिसून आले. मात्र, आता लशींचे डोस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने मोहीम पुन्हा सुरळीत सुरू होणार आहे.

दरम्यान, केंद्राकडून राज्याला कोव्हिशिल्डचे डोस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने आज जिल्ह्याला लशीचे जास्त डोस मिळाले आहेत. लसीकरणात पश्‍चिम महाराष्ट्रात सातारा जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. येत्या काही दिवसांत जास्तीतजास्त लशीची मागणी करणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्याला जास्तीतजास्त लशीचा पुरवठा होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १५ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे, तसेच, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याला लशींचा साठा जास्त प्रमाणात उपलब्ध होत असल्याचे लसीकरण विभागाचे नोडल अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT