सातारा

मंदिरात मुलीवर अत्याचार; शेंबडीच्या एकास सक्तमजुरी

प्रवीण जाधव

सातारा : शेंबडी (ता. जावळी) येथील एका मंदिरात मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी 80 वर्षांच्या वृद्धाला विशेष न्यायाधीश ए. के. पठणी यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. जिवाजी रामचंद्र साळुंखे (वय 80, रा. शेंबडी, ता. जावळी) असे शिक्षा मिळालेल्याचे नाव आहे. आरोपी साळुंखे व पीडित एका मंदिरात सेवा करण्याचे काम करत होते. 11 जानेवारी 2018 रोजी पीडितेचे वडील अंघोळीसाठी घरी गेले होते. त्यानंतर जिवाजीने मंदिरातील सर्व दिवे बंद करून पीडितेवर अत्याचार केला, तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास जीव मारून टाकण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ती गप्प बसली; परंतु तिला मासिक पाळी आली नाही. त्यामुळे तिच्या आईने जिल्हा रुग्णालयात तपासणी केली. तेव्हा ती गरोदर असल्याचे समोर आले. पीडितेच्या आईने तिला विश्‍वासात घेऊन विचारणा केली. तेव्हा तिने सर्व माहिती दिली.

त्यानंतर तिच्या आईने मेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तत्कालीन उपनिरीक्षक भीमराव झांजुर्णे यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. विशेष न्यायाधीश ए. के. पठणी यांच्या समोर खटल्याची सुनावणी सुरू होती. साक्षीदारांच्यास साक्षी व सहायक सरकारी वकील अनुपमा गाढवे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश पठणी यांनी जिवाजीला दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. 

सरकारी वकिलांना पोलिस प्रॉसिक्‍युशनकडून सहायक फौजदार उमा घार्गे, हवालदार शमशुद्दीन शेख, हवालदार अजित शिंदे, महिला हवालदार कांचन बेंद्रे, शेख, राजेंद्र कुंभार, अमित भरते, अश्‍विनी घोरपडे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून मेढा पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार संजय भोसले यांनी काम पाहिले.

चर्चाच चर्चा! उदयनराजेंची उद्धव ठाकरेंशी,शिवेंद्रसिंहराजे - अजित पवार

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI in Agriculture : ‘एल निनो’च्या मुकाबल्यासाठी ‘एआय’ची मदत, ४० लाख शेतकऱ्यांना होणार फायदा; कृषी विभागाकडून सूचना

Maharashtra Finance Ministry : अर्थ खाते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसकडे? पावसाळी अधिवेशनाआधी निर्णय होणार? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं...

Pune Water Supply: पुण्यात सोमवारपासून दिवसाआड पाणी; महापौरांच्या बैठकीत निर्णय, घटत्या पाणीसाठ्यामुळे पाऊल

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी अपडेट! कर्जमाफीची प्रक्रिया सुरू: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अंतर्गत मतभेदांमुळे ‘इंडिया’चे नेते अस्वस्थ

Trinamool Congress: ‘तृणमूल’मधील फुटीचे लोण दिल्लीपर्यंत; वीस खासदारांचा वेगळा गट, ‘एनडीए’ला पाठिंब्यासाठी पत्र

SCROLL FOR NEXT