सातारा

बापरे! कास पठार परिसरात घाेंगावताेय काेराेना

सूर्यकांत पवार

कास (जि.सातारा) ः कास पठार परिसरात कोरोनाचा विळखा वाढत चालला असून, कास गावातील बाधितांची संख्या आठ झाली आहे, तर कुसुंबीतील आखाडे वस्तीतील दोन दिवसांपूर्वी कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील त्याचा भाऊही कोरोना बाधित झाला आहे.
 
मुंबई नालासोपारा येथून 27 जूनला कासमध्ये एक कुटुंब आले. त्यातील 38 वर्षीय व्यक्तीला पहिल्यांदा त्रास झाल्याने बामणोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तो बाधित निघाल्याने त्याच्या निकट सहवासातील लोकांना शोधून 11 जणांना रायगाव येथील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्या अकरा जणांमधील सात व्यक्तींचे अहवाल गुरुवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कास या गावात बाधितांची संख्या आठ झाली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.

सरकारच्या भूमिकेच्या निषेर्धात राज्यातील ही दुकाने रविवारपर्यंत बंद राहणार

कुसुंबीतील आखाडे वस्तीतील रविवारी मुंबईवरून आलेल्या दोन व्यक्तींपैकी एका व्यक्तीचा दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याच्याबरोबर त्याचा भाऊही मुंबईवरून एकत्रित आला होता. त्यालाही रायगाव येथे ठेवले होते. त्याचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने आखाडे वस्तीची चिंता वाढली आहे. आज सकाळी गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, ग्रामसेवक चंद्रकांत कोळी, आशासेविका, आरोग्य सेवक यांनी वस्तीला भेट देऊन आवश्‍यक उपाययोजनांची माहिती घेऊन सूचना केल्या.

शिवेंद्रसिंहराजेंनी का बरं मानले अजित पवारांचे आभार, वाचा सविस्तर
 

सातारा : या तालुक्‍यातून सहा युवक वर्षभर तडीपार 

कास पठार परिसरातील आजूबाजूच्या गावात रुग्णासंख्या मुंबईवरून आलेल्यांमुळे वाढत असल्याने स्थानिक लोकांची डोकेदुखी वाढली आहे.

संपादन - सिद्धार्थ लाटकर 

असा हवेतूनही पसरू शकतो कोरोना, WHO ने जारी केली नवीन नियमावली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४० पैशांनी जीव जाणार नाही, प्रत्येक गोष्टीवर कर दिला पाहिजे; UPI शुल्कावर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं विधान, सांगितली चाणक्यनीति

Kagal Municipal Council : कागल नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; हसन मुश्रीफ, समरजित घाटगेंच्या कारभारावर सवाल, कर्मचाऱ्यांचा ठिय्या

Gold Rate Today: अमेरिकेच्या एका निर्णयाने सोनं स्वस्त! महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती? सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार?

Anant Nag: दिग्गज अभिनेते अनंत नाग यांना फाळके सन्मान, पंतप्रधानांनी ट्वीट करुन दिल्या शुभेच्छा

Kolhapur Crime: डॉ. सोनल वालावलकरला गर्भलिंग निदानप्रकरणी मोका, हॉस्पिटलवर छापा; डॉक्टर पसार

SCROLL FOR NEXT