सातारा

सातारकरांनाे! काेविड 19 ची चाचणी टाळू नका; 'आरटीपीसीआर' चाचणी झाली स्वस्त

किरण बाेळे

फलटण शहर (जि. सातारा) : राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून, आता कोरोना निदानासाठी आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहेत. याबरोबरच रॅपीड अँटिजेन, अँटीबॉडीज तपासणीचे दरही कमी करण्यात आले असून, अँटिजेन टेस्ट 150 रुपयांत करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्‍चित करण्यात येत असून, आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा करून 4500 रुपयांवरून आता नव्या सुधारित दरानुसार केवळ 500 रुपयांत ही चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
 
आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटिजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्‍चित करण्यात आले आहेत. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरून अथवा एकत्रित नमुने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जावून नमुने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी 250, 300 आणि 400 असे दर निश्‍चित करण्यात आले आहेत.

सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी 350, 450, 550 असे दर निश्‍चित करण्यात आले आहेत. रॅपीड अँटिजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास 150, 200 आणि 300 असे दर आता निश्‍चित करण्यात आलेले आहेत, असेही प्रांताधिकारी जगताप यांनी स्पष्ट केले. 

बाजार सुपर स्प्रेडर ठरत असल्याने सुरक्षितता म्हणून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

Man Ki Baat : बहादरपुराच्या पेठकर कुटुंबाचे पंतप्रधान मोदींकडून ‘मन की बात’मध्ये कौतुक

Latest Marathi News Update : उध्दव ठाकरे कधीही जबाबदारी टाळणारा नाही - उद्धव ठाकरे

SAW vs BANW Live: दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली! भारताला स्पर्धेबाहेर फेकले? हरमनप्रीत कौरच्या संघाला एकच गोष्ट वाचवू शकते

CISF Bus Accident: कटरामध्ये CISF जवानांच्या बसला भीषण अपघात; ९ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर, कशी घडली घटना?

SCROLL FOR NEXT