सातारा

बहरणा-या पर्यटनासाठी महाबळेश्वर पालिका सज्ज : पल्लवी पाटील

अभिजीत खूरासणे

महाबळेश्वर : महाबळेश्वर पालिकेने केलेल्या आवाहनास कोरोना चाचणीसाठी शहरातील सुपर स्प्रेडर असलेल्या बाजारपेठेतील व्यापारी यांचे सहसर्वच घटकांतून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन दिवसात 655 व्यक्तींची चाचणी घेण्यात आली. या पैकी केवळ दाेघेच बाधित आढळले असल्याची माहीती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.

महाबळेश्वरातील कोराेना बाधितांचा आकडा रविवारी शुन्यावर आला होता. महाबळेश्वर हे कोरोनामुक्त झाला होते परंतु गेली तीन दिवस शहरातील सुपर कोरोना स्प्रेडर म्हणून ओळखले जाणारे विक्रेता यांची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये बाजारपेठेतील व्यापारी सलुन दुकानदार, भाजी विक्रेते, पथारीवाले, टपरीवाले गाळेधारक दुकानातील कामगार पाणीपुरीवाले, मक्याचे कणीस विक्रेते घाेडेवाले, टॅक्सीचालक आदी सर्वच घटकांची कोरोना चाचणी घेण्यात येत आहे.

महाबळेश्वर, पाचगणी पुन्हा लाॅकडाउन करु : जिल्हाधिका-यांचा गर्भित इशारा

गेल्या तीन दिवसात 655 व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये दाेन व्यक्तींच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली. महाबळेश्वर येथील पालिकेचा बोटक्लब पाठोपाठ येथील सर्व प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. ही पर्यटन स्थळे अर्थात पॉइंर्ट पाहण्यासाठी पर्यटकांची तसेच दिवाळी सुट्ट्ीसाठी येथे मोठया प्रमाणावर पर्यटक भेट देण्यासाठी येणार आलेले पर्यटकांमध्ये कोरोना बाधित असल्याची शक्यता नाकारता येत नाही.  बाधित पर्यटकाकडुन कोरोनाचा संसर्ग होवु शकतो किंवा आपल्यातील कोरोना बाधितामुळे पर्यटकांनाही कोरोनाची बाधा होण्याचा धोका होवु शकतो म्हणुन पर्यटकांच्या संपर्कात येणारे प्रत्येक घटकांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन पालिका प्रशासनाने केले होते.

खुशखबर! वेण्णालेक बोट क्‍लब पर्यटकांसाठी खुला

पालिकेच्या आवाहनास प्रथम महाबळेश्वर येथील नागरीकांनी गांभिर्याने घेतले नाही मात्र पालिकेने दुकानदारांना नोटीसा बजावल्या व कारवाईचा इशारा दिला. तेव्हा व्यापारी टॅक्सी चालक यांनी पालिकेने केलेल्या आवाहना नुसार येथील ग्रामीण रूग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठी गर्दी केली. गेल्या तीन दिवसात शहरातील 655 व्यक्तींची चाचणी घेण्यात आली यापैकी केवळ दोन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे.

कोरोनाबाधितांसाठी शंभर रुपयांत होम आयसोलेशन किट

Edited By : Siddharth Latkar
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT