Leopard
Leopard esakal
सातारा

निवी-कसणीत रानडुक्कर, गव्यांचा पिकांत धुमाकूळ; बिबट्याच्या हल्ल्यात गाय, शेळी ठार

राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : या विभागातील दुर्गम निवी व कसणी परिसरात बिबट्याच्या (Leopard) हल्ल्यात गाय व शेळीचा मृत्यू झाला. बिबट्याच्या वाढत्या उपद्रवाने तेथील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. (Cow Goat Killed In Leopard Attack Satara News)

सातारा व सांगली जिल्ह्याच्या सीमेवर घनदाट जंगलालगत वसलेल्या निवी-कसणी परिसरात वन्य प्राण्यांचा सतत उपद्रव जाणवतो. रानडुक्करे व गव्यांच्या उभ्या पिकातील धुमाकुळाबरोबरच बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले होण्याच्या घटना तेथे सतत घडतात. अलीकडे तर अशा घटनांत मोठी वाढ झाल्याने त्या परिसरात चिंतेचे वातावरण आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाय व शेळीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच तेथे घडली. निवीतील पारुबाई मस्कर व अन्य तिघी महिला सायंकाळी पाचच्या सुमारास गावाजवळच्या म्हाळुंगीचा ओढ्याच्या परिसरातून जनावरे घेऊन घराकडे निघाल्या असताना तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने कळपातील शेळीवर हल्ला करत तिला फरफटत नेले.

या घटनेनंतर घाबरलेल्या महिलांनी घराकडे धाव घेऊन ग्रामस्थांना माहिती दिली. दोन दिवस शोधाशोध केल्यावर जवळच्याच एका घळीत अर्धवट खाल्लेले शेळीचे अवयव आढळून आले. दरम्यान, कसणी येथील बुरूमवस्तीतील संजय पाटील यांच्या घराजवळ जनावरांसाठी तयार केलेल्या मांडवात घुसून बिबट्याने गाईवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली. जनावरांचा आरडाओरडा ऐकून पाटील कुटुंबीय तिकडे धावल्यावर बिबट्याने तेथून पळ काढला. वनपाल सुभाष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक जयवंत बेंद्रे, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती पाटील, धनाजी पवार आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Cow Goat Killed In Leopard Attack Satara News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT