Crime News esakal
सातारा

सातारा : जमिनीवर डोके आपटून शिरवळ स्थानकात खून

अशपाक पटेल

शिरवळ : शिरवळ (ता. खंडाळा) येथील एसटी बस स्थानकाच्या सुलभ प्रसाधनगृहात गळा दाबून व डोके आपटून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. रणजित गणपत जाधव (वय ४०, रा. बौद्ध वस्ती, शिरवळ) असे या खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना किरकोळ वादातून झाली असल्याचा पोलिसांना संशय आहे.

एका संशयितास ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरु आहे.

शिरवळ बस स्थानकातील सुलभ प्रसाधनगृह चालवण्याचे काम रणजित करत होते. पोलिसांनी सांगितले, की शिरवळ एसटी बस स्थानकावर काल (गुरुवारी) रात्री अज्ञाताने रणजित जाधव यांचा गळा दाबून, जमिनीवर डोके आपटले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूकडून रक्त आले असल्याचे दिसते. ही घटना आज सकाळी उघडीस आल्यानंतर शिरवळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश इंगळे, पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे, वृषाली देसाई व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. साताऱ्याहून ठसे तज्ज्ञांनी पाहणी केली. श्वान पथकाच्या मदतीनेही मारेकऱ्याचा शोध घेण्यात आला. घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला आहे.

दरम्यान, घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजमधून व श्वान पथक, ठसे तज्ज्ञांकडून काही धागेदोरे हाती लागतील का, याची चाचपणी शिरवळ पोलिस करत आहे. या घटनेबाबत काही संशयितांची दिवसभर चौकशी करण्यात आली. या घटनेचे गांभीर्य पाहता वाईचे पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे व फलटणचे पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी शिरवळ पोलिस ठाण्याला भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. ही घटना किरकोळ वादातून झाली असल्याचा पोलिसांना संशय आहे. सकाळपासून बघ्यांनी गर्दी केली होती. मृताचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक महेश इंगळे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

Chhatrapati Sambhajnagar: दिवसभर उकाडा; सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी; विजांच्या कडकडाटासह शहरभर पावसाचे आगमन

Shaktipith Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलला, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, हातकणंगले वगळले

Pune Rain News: पुण्याला गारांच्या पावसाचा तडाखा; मध्यवर्ती भागासह उपनगरांत नागरिकांची तारांबळ, झाडपडीच्‍या आठ घटना!

Chhatrapati Sambhajinagar: त्याने भरले बेरंगी आयुष्यात रंग!; ऑटिझमवर मात करीत स्वराज राजपूत बनला आईचा आधार

SCROLL FOR NEXT