Satara Latest Marathi News 
सातारा

वीज कनेक्‍शन तोडल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण; कोंडव्यात हॉटेल चालकासह दोघांवर गुन्हा

गिरीश चव्हाण

सातारा : वीज कनेक्‍शन तोडल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याप्रकरणी कोंडवे (ता. सातारा) येथील आनंता लावंघरे आणि अभिषेक लावंघरे यांच्यावर काल सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

कोंडवेच्या हद्दीत आनंता लावंघरे यांचे अनंतराज मल्टीपर्पज हॉल, राजदीप हॉटेल असून, त्याठिकाणचे वीज कनेक्‍शन हिराबाई पांडुरंग लावंघरे यांच्या नावे आहे. वीजबिल न भरल्याने काल वीज वितरण कर्मचारी रामदास शंकर कार्वे (रा. यवतेश्‍वर) हे कनेक्‍शन कापण्यासाठी आले होते. 

कार्वे यांनी वीज कापल्याच्या रागातून आनंता पांडुरंग लावंघरे, अभिषेक आनंता लावंघरे (दोघे रा. कोंडवे, ता. सातारा) यांनी कार्वे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. याची फिर्याद रामदास कार्वे यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंदवली असून, आनंता लावंघरे, अभिषेक लांवघरे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक चौधरी करीत आहेत. 

RAWचा अधिकारी सांगणाऱ्या गवडीतील तोतयास सातारा पोलिसांनी देवकलात केली अटक

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT