culture Sri siddhnath Rathotsava in nimsod satara marathi news
culture Sri siddhnath Rathotsava in nimsod satara marathi news Sakal
सातारा

Satara News : गुलाल, खोबऱ्याच्या उधळणीत निमसोडमध्ये सिद्धनाथाचा रथोत्सव उत्साहात

शशिकांत धुमाळ

निमसोड : श्री सिद्धनाथाच्या नावानं चांगभलंच्या गजरात व गुलाला, खोबऱयाची उधळण करीत  निमसोड (ता.खटाव) येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ देवाचा वार्षिक रथोत्सव शनिवार ता.25 रोजी मोठ्या भक्ती - भावपूर्ण वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितित संपन्न झाला.

 सकाळी श्री सिद्धनाथांची विधीवत षोडोपचारे पूजाविधी व महाआरती झाल्यानंतर मानकऱयांमाना मार्फत श्रींची रथामध्ये स्थापना केल्यानंतर गावातील  घाडगे, मोरे व देशमुख या प्रमुख तीन भावकींचे प्रतिनिधींसह प्रमुख  मान्यवरांच्या उपस्थितीत रथाचे पूजन करुन श्रीफळ वाढवून गुलाल-खोबऱयांची उधळण करण्यात आली. सिद्धना्थाच्या नावानं चांगभलं-- नाथबाबाच्या नावानं चांगभल---- गजर करीत रथोत्सवास मिरवणूकीस  प्रारंभ करण्यात आला.

यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांची व यात्रेकरूंची गर्दी दिसून आली पै पाहुणे माहेरवाशिणींसह, बालचमूंची खुप गर्दी होती. निमसोड मधील प्रतिष्ठित विविध मान्यवरांसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, दोन्ही  सोसायटीचे सर्व सदस्य,विविध पतसंस्था  तरुण मंडळाचे अध्यक्ष व सदस्य, ग्रामस्थ,महिला व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फुलांनी सजवलेल्या तीन मजली लाकडी रथामधून श्री सिध्दनाथ  रथोत्सव मिरवणुकीस प्रारंभ झाला. रथापुढे गजी, लेझिम, ढोल-ताशा, बॅंड पथकासह अश्वारुढ मानकरी,सेवेकरी भाविकांच्या उपस्थितीमुळे रथ मिरवणूकीची शोभा वाढली होती.

गावातील विविध तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व भाविकांनी रथ ओढून आपली सेवा अर्पण केली. श्री सिद्धनाथाची रथ मिरवणूक चावडी चाैक,बाजारपेठ मार्गे, हनुमान चाैक,शनिवार पेठ,कन्या शाळा, भैरु टाका, मोराळे रोड,देशमुख गल्ली, ग्रामपंचायत चावडी चाैक, घाडगे गल्ली,होळीचागांव रस्ता मार्गे,

मुख्यपेठ मार्गे,रात्री साडेदहाच्या सुमारास श्री सिद्धनाथ मंदिरापर्यंत आल्यानंतर  रथोत्सवमिरवणुकीची महाआरती करुन सांगता करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गावातील तरुण मंडळांचे कार्यकर्ते,बॅंकेचे कर्मचारी यांनी भावभक्तीने देणगी रक्कमेची मोजदाद  सुरु होती.

रथ मार्गावरती ठिकठिकाणी, रांगोळी,स्वागत कमाणी उभारण्यात आल्या होत्या. गावातील सर्व मा्हेरवाशीणींसह परिसरातील भाविक,गलई कामगार, आपल्या वार्षिक उत्पन्नाचा काही भाग व बोललेला नवस फेडण्यासाठी नारळाची तोरणे व एक रुपये ते दोन हजार रुपये नोटांच्या माळा मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात गुलाला खोबऱयाची उधळण करीत अर्पण करीत होते.

प्राथमिक आरोग्य केंद्र निमसोडचे डॉ. अजिंक्य पुस्तके व डॉ सुयोग काटकर  यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते आरोग्य पथक तैनात  करण्यात आले होते. विद्युत महावितरणचे सहाय्यक अभियंता विशाल घुटुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वीज कर्मचाऱ्यांनी होळीचा गाव रोडवरील विद्युत खांबाची उंची वाढवून रथ मार्ग तातडीने मोकळा करून दिल्याबद्दल ग्रामस्थांकडून कौतुकासह अभिनंदन करण्यात आले.

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मायणी पोलीस दूर क्षेत्रांतर्गत पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व होमगार्ड यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता.

निमसोडला आज कुस्ती दंगल

दरम्यान, उद्या  रविवार ता.26 रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कमल वनिता कराडकर यांचा बहारदार लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. तर दुपारी 2 वाजता 100 रुपये ते 4 लाख रुपये इनामा पर्यंतच्या नामांकित मल्लांचे भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात येणार आहे. कुस्ती शौकीनांनी बहुसंख्येने उपस्थित राहून मैदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन  यात्रा  उत्सव कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT