Machindra Sakate
Machindra Sakate sakal
सातारा

Machindra Sakate : दलित महासंघाच्या आंदोलनामुळे साताऱ्यात राजकीय खेळी

प्रशांत पाटील

- सचिन शिंदे

तीन दशकांहून अधिक काळ दलीतांच्या मागण्यांसह त्यांच्या हक्कासाठी झटणाऱ्या प्रा. मच्छींद्र सकटे व त्यांच्या दलीत महासंघाने लोकसभा निवडणुकीत खऱ्या दलित समाजाला डावलल्याने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रणांगणात उतरण्याचा इशारा दिला आहे. प्रा. सकटे यांनी भाजप व काँग्रेसचा निषेध केला.

पुणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेष केला. निवडणुक आयोगाकडेही ते तक्रार करणार आहेत. त्या निषेधाचाच एक भाग म्हणून कऱ्हाडला उद्या (शुक्रवारी) व शनिवारी (ता. ६) अनुक्रमे भाजपचे नेते अतुल भोसले व कॉग्रेसचे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर निदर्शनाचा इशारा दिला आहे.

त्यानिमित्ताने दलीतांच्या मतांकडे सातारा लोकसभा मतदार संघाचे लक्ष जाणार आहे. त्यांच्या आंदोलनाचा किती परिणाम होईल हा भाग अलहीदा मात्र प्रा. सकटे यांच्या निमित्ताने त्याही मतांच्या गठ्ठ्याकडे राजकीय पक्षांना लक्ष देण्यास निश्चीत भाग पाडले जाईल...

लोकसभेचे रणधुमाळी देशभर सुरू आहे. प्रस्थापित राजकीय पक्षानी राज्यात तिकीट वाटप करताना दलित चळवळींना व त्यांच्या पक्ष संघटनांना पूर्णपणे डावलले आहे, असा होरा देत दलित महासंघ व बहुजन समता पक्षातर्फे त्याचा निषेध करत आहोत, असे प्रा. सकटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांनी त्या विरोधात श्री. भोसले आणि माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे.

दलीत महासंघ त्याची उद्यापासून सुरूवात करत आहे. त्या निमित्ताने सातारा लोकसभा मतदार संघात उमेदवारीच्या घोळामुळे दुर्लक्षीत झालेल्या दलीत किंवा तत्सम मतांच्या गठ्ठ्याकडे राजकीय पक्षांचे लक्ष वेधले जाणार आहे. प्रा. सकटे यांच्या इशाऱ्याची दखल प्रशासकीय पातळीवर घेतली गेली आहे.

प्रा. सकटे व त्यांच्या सहकाऱ्यांना संपर्क साधून आंदोलनाची नक्की दिशा शोधण्यात शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. त्या आंदोलनामुळे सातारा लोकसभा मतदार संघात दलीत महासंघ राजकीय खेळी जरी खेळत असला तरी त्या निमित्ताने प्रा. सकटे व दलीत महासंघ फोकसमध्ये निश्चीत येत आहे.

राजकीय पक्षाने तिकीट वाटताना दलित चळवळीमधील नेत्यांना व त्यांच्या पक्ष संघटनांना पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते, डॉ. बाबासाहेब आबेडकरांचे नातू यांची महाविकास आघाडीने काय हालत केली. महायुतीने रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडे यांना एकही जागा दिलेली नाही. त्यामुळे दलीत कार्यकर्तेही नाराज आहेत, असे म्हणत प्रा. सकटे यांनी थेट वर्मावर बोट ठेवल्याचेही जाणवते.

राखीव मतदार संघातील उमेदवारी देताना ज्या जातींचा हक्क आहे, त्या जातींना डावलले आहे. फुले, आबेडकरी चळवळींनागी डावलून अन्य समाजातील लोकांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्याही विरोधात संघर्षाचा दलीत महासंघाने दिलेला इशारा न्शिचीतच परिणामकारक ठरण्याची चिन्हे आहेत.

त्याचा परिणाम नक्कीच लोकसभांच्या निवडणुकीवर होणार का, झालाच तर त्यांच्या टक्का किती असेल तेही येणाऱ्या काळात पाहायला मिळेल. दलीत महासंघाचा राज्यभर नसला तरी पश्चीम महाराष्ट्रात निश्चीत प्रभाव आहे. त्यामुळे त्या सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या आघाड्यांवर होणारा प्रचार व त्यांचे आंदोलन निश्चीत स्वरूपात राजकीय पक्षांना दलीत महासंघाकडे लक्ष वेधण्यास कारणीभूत ठरणारेच आहे.

मातंग समाजामध्ये असंतोष

महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी सहा जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असून, या सहाही जागांवर महाविकास आघाडीने आणि महायुतीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत, मात्र कोणत्याही प्रस्तापित राजकीय पक्षाने मातंग समाजाला उमेदवारी दिलेली नाही. परिणामी संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजामध्ये असंतोष आहे.

- प्रा. मच्छींद्र सकटे, नेते, दलीत महासंघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: ९० वर्षांचे भाजप नेते राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT