सातारा

शेवटच्या ठेवीदारालाही पैसे मिळेपर्यंत लढणार; 'कराड जनता' च्या बचाव कृती समितीचा निर्धार

सचिन शिंदे

कऱ्हाड : अनेक वर्षांपासूनचे गैरव्यवहार, शासकीय नियमांकडे केलेल्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे कराड जनता बॅंक दिवाळखोरीत गेली. ठेवीदारांचे सगळे पैसे परत मिळेपर्यंत कराड जनता सहकारी बॅंकेचा लढा कायम सुरू ठेवण्याची भूमिका कराड जनता बॅंक सभासद, ठेवीदार बचाव कृती समितीने स्पष्ट केली आहे.
 
आयुष्याची पै न पै करून साठवलेली पुंजी क्षणार्धात मातीमोल झाली. त्यामुळे अनेक ठेवीदारांनी मृत्यूला कवटाळले, काही जण मनोरुग्ण झाले. चार कर्जदारांकडे 500 कोटींची विनातारण दिलेली कर्जे आहेत. त्यातील एक रुपयाही वसूल होत नाही, अशावेळी ज्यांनी यावर लक्ष ठेऊन कारवाई करायची ती रिझर्व्ह बॅंक, सहकार खाते नेमके करत काय होते, असा गंभीर प्रश्‍न आहे. केंद्र सरकार अशा नियामक यंत्रणांवर काय कारवाई करणार का, हाही प्रश्न आहे. त्यामुळे त्यासाठीही लढा कायम राहणार आहे. कराड जनता बॅंकेतील दोषींवर न्यायालयाच्या आदेशाने फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. दोन वर्षांत त्याचा तपास करण्यास पोलिसांना वेळ नाही, तो त्यांनी तातडीने करावा. मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेमध्ये दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी बचाव कृती समिती करणार आहे.

समाजहिताची कामे करीत गुण्यागोविंदाने नांदत आहे 30 जणांचे एकत्र कुटुंब!

रिझर्व्ह बॅंक, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्याकडे निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यावरही समिती ठाम आहे. ठेवीदारांच्या हिताच्या रक्षणासाठी बॅंक सक्षम बॅंकेत विलीन करावी, यासाठी कृती समिती प्रयत्न करणार आहे. सामान्य जनतेचा बॅंकिंग क्षेत्रावरचा विश्वास वाढेल, सामान्य जनतेच्या ठेवींवरच बॅंकिंग क्षेत्राचा डोलारा उभा आहे, ठेवीदारांचा विश्वास गमावल्यास तो कोसळायला वेळ लागणार नाही. सध्या बाळासाहेब पाटील हे सहकारमंत्री आहेत, त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जिल्ह्यातील कराड जनता बॅंक दिवाळखोरीत गेलेली असताना जनतेचे पालक या नात्याने त्यांनी हा प्रश्न सोडवावा, अशी समितीची मागणी आहे, ते नक्की हा प्रश्न सोडवतील, असा समितीला विश्वास आहे. 

लक्ष्मी विलास बॅंकेला जो न्याय दिला तोच न्याय कराड जनता बॅंकेला लावावा अन्यथा सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही.

- विवेक ढापरे, सचिव, कराड जनता बॅंक सभासद, ठेवीदार बचाव कृती समिती, कराड. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: IPL 2026 चा सर्वात मोठा पुरस्कार जिंकला, पण वैभव सूर्यवंशी त्याचा वापरच करू शकत नाही; पाहा काय आहे कारण

Cyber Cell Negligence : पतीच्या खोट्या तक्रारीमुळे पत्नीचा मोबाईल नंबर बंद; हायकोर्टाचा पोलिसांसह मोबाईल कंपनीला दणका

हसवणार... घाबरवणार... आणि वेड लावणार ! ‘भूतम भयम्’ २४ जुलैला थिएटरमध्ये धडकणार

Latest Marathi News Update : वाशिम शहरालगत मध्यरात्री दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

Aundh Water Crisis: औंधसह परिसरावर पाणीटंचाईचे सावट; येळीव तलाव कोरडा, साठा झपाट्याने कमी होत असल्याने टँकरची मागणी

SCROLL FOR NEXT