Panchgani Ghatjai Kaleshwari sakal
सातारा

Navratri 2024 : घाटजाई काळेश्वरीच्या दर्शनासाठी पाचगणीत गर्दी

Panchgani Ghatjai Kaleshwari : पाचगणीत शिवकालीन जागृत देवी श्री घाटजाई काळेश्वरीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी वाढली आहे. दर मंगळवारी व शुक्रवारी विशेष दर्शनासाठी भाविकांची मोठी उपस्थिती असते.

सकाळ वृत्तसेवा

पाचगणी : येथील शिवकालीन जागृत ग्रामदैवत श्री घाटजाई काळेश्वरीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली असून, शहरात नवरात्रोत्सवाला उधाण येऊ लागले आहे.

श्री घाटजाई व श्री काळेश्वरी येथील शिवकालीन जागृत ग्रामदैवत असून, दरवर्षी देवीची यात्रा माघ वद्य नवमीला होते. डोंगरमाथ्यावर वसलेल्या घाटजाई काळेश्वरीची यात्रा गुलाल, खोबऱ्याची होणारी उधळण आणि ढोल वाजविणाऱ्यामध्ये होणारी चढाओढ याकरिता प्रसिद्ध आहे.

दर मंगळवारी व शुक्रवारी भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी जातात. घाटजाई काळेश्वरीच्या मंदिरात स्थापना झाल्यानंतरच घरोघरी घटस्थापना होत असते. घाटजाई काळेश्वरीच्या मंदिरात स्थापना झाल्यानंतरच घरोघरी घटस्थापना होत असते.

विजयादशमीदिवशी मंदिरात दर्शन घेऊन भाविक शिल्लंघनासाठी बाहेर पडतात. नवरात्रोत्सवात देवींच्या दर्शनासाठी व मंदिरातील घाटाला तिळाच्या फुलांच्या माळा अर्पण करण्यासाठी भाविक येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT