ढेबेवाडी : ढेबेवाडी- कऱ्हाड मार्गावरील सुमारे २५ किलोमीटरच्या अंतरात तीन- चार रस्ते एकत्र जोडणारे सुमारे १८ फाटे अपघाताची स्थळे बनली असून, यातील काही फाटे तर अतिधोकादायक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तेथे सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज आहे.
ढेबेवाडी- कऱ्हाड मार्गावर अनेक गावे आणि वाड्यावस्त्या वसल्या आहेत. अनेक गावांकडे जाणारे रस्ते या मुख्य रस्त्याशी जोडलेले आहेत. अलीकडे काही वर्षांपूर्वी ढेबेवाडी- कऱ्हाड रस्त्याचे चौपदरीकरण झाले असून, अगोदरपासूनच मोठी वर्दळ असलेल्या रस्त्यावरील वाहतूक त्यामुळे अधिकच वेगवान झाल्याचे दिसून येत आहे. उपरस्त्यांनी मुख्य रस्त्यावर येताना सध्या वाहनचालक व पादचाऱ्यांची मोठीच कसरत होत आहे.
त्यात लहान-मोठे अपघातही होत आहेत. येथील डॉ. राव यांच्या जुन्या हॉस्पिटलजवळच्या फाट्यापासून कऱ्हाडजवळील ढेबेवाडी- मलकापूर फाट्यापर्यंतच्या २५ किलोमीटरच्या अंतरात १८ धोकादायक फाटे असून, येथील डॉ. राव व बस स्थानक चौक, मालदन फाटा, गुढे- काळगाव फाटा, खळे, तळमावले,
मानेगाव -कुंभारगाव फाटा तसेच काढणे, तारुख, कुसूर, कोळेवाडी, कोळे, घारेवाडी, विंग, चचेगाव आदी ठिकाणचे फाटे तर अतिधोकादायक आहेत. यातील काही फाट्यांवर बांधकाम विभागाने सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या असल्या तरी अनेक फाटे उपाययोजनांअभावी धोकादायक स्थितीत आहेत. यावर काय उपाययोजना करणार की घडणाऱ्या दुर्घटना बघत बसणार? याकडे जनतेचे लक्ष आहे.
* सुमारे २५ किलोमीटरमध्ये अनेक ठिकाणी धोका
* चौपदरीकरणापासून गावांच्या अडचणीत वाढ
* मुख्य रस्त्यावर प्रवेश करताना होतात अपघात
* बांधकामकडून सुरक्षेच्या उपाययोजना शून्यच
* रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांचीही मोठी कसरत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.