Dhom Dam Sakal
सातारा

वाई : खानापूरातील धोमच्या कालव्याला भगदाड; लाखो क्युसेक पाणी वाया

या ठिकाणी असलेल्या कालव्याचे सिमेंट यापूर्वीच ढासळल्याने फक्त मातीचाच आधार राहिला होता.

सकाळ वृत्तसेवा

भुईंज : धोम धरणाचा (Dhom Dam) डाव्या कालव्याला खानापूर (ता.वाई) येथे पहाटे साडेतीन वाजता भगदाड पडल्याने लाखो क्युसेक पाणी वाहून गेले. या ठिकाणी असलेल्या कालव्याचे सिमेंट यापूर्वीच ढासळल्याने फक्त मातीचाच आधार राहिला होता. (Satara Marathi News)

भगदाड ओढ्याच्या दिशेने पडल्याने शेती वाहून जाण्याचे मोठे नुकसान टाळले. मोठ्या प्रमाणात पडलेल्या या भगदाडातून पाण्याचे लोट वाहू लागल्याने ते सर्व पाणी ओढ्याच्या अरुंद पात्रातून धावत असल्याने शेतजमीन वाहून जाण्याचा धोका शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला होता. या कालव्याला नेहमीच मोठी भगदाडे पडत असतात.

मात्र, यामुळे शेतीला पाणीपुरवठा करण्यात अडथळा येणार आहे. धोम धरण पाटबंधारे विभागाने वेळीच कालवा दुरुस्त केला असता तर ही दुर्घटना टळली असती, असे ग्रामस्थांनी सांगितले. मागील दोन- तीन दिवसांपासून कालव्यात साडेचारशे क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते. पहाटे चार वाजता कालव्यातील विसर्ग बंद करण्यात आला आहे.

धोम धरण व्यवस्थापन याकडे लक्ष कधी देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढे ते पाणी अनेक गावांना जाणार होते. त्यामुळे त्या गावच्या शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटणार होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT