सातारा

ग्राहकांकडून सक्तीने कर्ज वसुली केल्यास कारवाई : जिल्हाधिकारी शेखर सिंह

Balkrishna Madhale

सातारा : मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वसुलीबाबत रिझर्व्ह बँक आॕफ इंडियाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, तसेच ग्राहकांकडून सक्तीने वसुली करत असल्याच्या तक्रारीविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा देतानाच, ग्राहकांनी अशा कंपन्यांच्या तक्रारींसाठी १८००१०२१०८० वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

सध्याच्या कोविड-१९ महामारीच्या अनुषंगाने केंद्रशासन आणि राज्य शासनाकडून वेळोवेळी लाॅकडाउन करण्यात आले आहे. शासनाकडून मदतीच्या उपाय योजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीबाबत काही ग्राहकांच्या तक्रारी आढळून येत आहेत. तर काही ग्राहकांना अशा मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या व्याज दर, विविध शुल्क व दंड,  तसेच अन्य तक्रारी असतील तर त्यांनी १८००१०२१०८० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. ही सुविधा मराठी भाषेत असल्याने ग्राहकांनी यावर तक्रारी दाखल कराव्यात, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वसुली बाबतीत रिझर्व्ह बँक आॅफ  इंडियाच्या दिशा निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. जर कंपन्यांनी ग्राहकांकडून सक्तीने वसुली करत असल्याचे निदर्शनास आल्यास, अशा तक्रारीविरोधात योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Second Phase Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील ५० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, १३ एप्रिल ते २४ मे रोजी रंगणार सामने

युद्धामुळे संकट! केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? PM मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बोलावली बैठक

ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १ तासाचा प्रवास आता फक्त १० मिनिटांत होणार; पूर्व-पश्चिम मुंबई जोडणारा गेमचेंजर प्रकल्प आहे तरी काय?

Mumbai News: मिठी नदीची साफसफाई केली जाणार, नऊ लाख टन गाळ उपशाचे उद्दिष्ट; कधीपासून काम सुरू होणार?

तुम्हाला माहिती आहे का? ‘धुरंधर’चं शूटिंग संजय दत्तच्या शाळेतच झालंय! 'हे' कलाकारही आहेत माजी विद्यार्थी

SCROLL FOR NEXT