Adani Group Power Project Tarli Dam esakal
सातारा

'शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारा अदानी ग्रुपचा वीज प्रकल्‍प रद्द करा'; प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा

क्रांतिकारकांनी या जिल्ह्यात प्रतिसरकार स्थापन करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते.

सकाळ डिजिटल टीम

‘‘या प्रकल्पाला २०१४ रोजी मान्यता दिली आहे. दहा वर्षे लोक अंधारात आहेत. लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला गेला आहे.''

तारळे : तारळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कळंबे, डफळवाडी, तोंडोशी या ठिकाणी शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारा अदानी ग्रुपचा हायड्रो पॉवर प्रोजेक्ट रद्द करावा, जनसुनावणी रद्द करावी. या प्रकल्पामुळे बाधित होणारे प्रकल्पग्रस्त व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी ता. ७ एप्रिल रोजी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा मेळावा घेणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी जाहीर केले.

येथील विकास सेवा सोसायटीच्या हॉलमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यास बाधित होणारी गावे आणि लाभक्षेत्रातील गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘हा पॉवर प्रोजेक्ट हा पूर्णपणे अव्यवहार्य असून, यामध्ये तेलंगणा राज्यातील एका प्रकल्पाचा अहवाल जोडून चुकीचा अहवाल तयार केला आहे. यामध्ये येथील जैवविविधता, निसर्ग साधन संपत्ती, वन्यजीव, भूकंपप्रवण क्षेत्र याचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही.

तारळी धरणाच्या लाभक्षेत्रात असलेल्या गावातील सिंचनावर काय परिणाम होणार आहे, याचा उल्लेख केलेला नाही. काही लोक विकासाला विरोध करू नका म्हणून सांगतात; परंतु आधीच तालुक्यातील धरणांमध्ये ज्यांनी जमिनी दिल्या. त्यांचे काय हाल झाले व होत आहेत. याचा विचार केला आहे का?’’

डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘हा जिल्हा क्रांतिकारकांचा लढाऊ जिल्हा आहे. नाना पाटील, किसन वीर, दिनकरराव निकम या आणि अशा अनेक क्रांतिकारकांनी या जिल्ह्यात प्रतिसरकार स्थापन करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. हा इतिहास विसरता कामा नये. हे सह्याद्रीचे पठार आम्ही उद्‌ध्वस्त करू देणार नाही. हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा आहे. त्यामुळे राजकीय पक्ष बाजूला ठेऊन जनतेने एकत्र लढा देऊन जनसुनावणी रद्द करून घेऊया.’’

सदाभाऊ जाधव म्हणाले, ‘‘या प्रकल्पाला २०१४ रोजी मान्यता दिली आहे. दहा वर्षे लोक अंधारात आहेत. लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला गेला आहे. या ठिकाणी असलेल्या शाळा, मंदिरे याची नोंद घेतली नाही. शिवाय प्रदूषित पाणी नदीत सोडल्याने मासे, खेकडे किंवा पिण्याचे पाणी यावर होणारा परिणाम याचा विचार केलेला नाही.’’

या वेळी प्रशांत पवार, उत्तम मगर, राजाभाऊ जगधनी, प्रदीप निकम, भाऊसाहेब निकम, शंकर पन्हाळकर, जोतिराम जाधव, जोतिराम जाधव, खबाले बापू, अभिजित जाधव, सखाराम सपकाळ, ज्ञानदेव सपकाळ, भरत जाधव, आनंदा सपकाळ, जयसिंग पन्हाळकर, बाजीराव पन्हाळकर, शिवाजी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. रमेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT