Due to corona, Kartik Yoga Yatra in Shri Kshetra Rajpuri has been canceled 2.jpg 
सातारा

श्री क्षेत्र राजपुरीतील कार्तिक योग यात्रा रद्द

रविकांत बेलाेशे

भिलार ( सातारा) : श्री क्षेत्र राजपुरी (ता.महाबळेश्वर) येथे कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा तीन वर्षातून खास माहिलांसाठी येणारा योग रविवारी (ता.29) येत आहे. परंतु ग्रामस्थांनी यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परगावाहून कुणीही दर्शनासाठी येवू नये, असे आवाहनही ग्रामस्थांनी केले आहे. 

आज शनिवारी पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सतीश पवार यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली. यावेळी चर्चेअंती कोरोना संकटामुळे मंदिर व परिसरात भाविकांची गर्दी होवू नये, यासाठी यंदा कार्तिक स्वामी मंदिरात फक्त धार्मिक विधी करून बाकी अन्नदान व इतर कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. दर तीन वर्षांतून खास महिलांसाठी हा योग येत असतो. तो यंदा रविवारी (ता.29) येत आहे. तीन वर्षांनी या योगा निमित्त कार्तिक स्वामी दर्शनासाठी भाविकांची रीघ लागते. यावेळी सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. 

राजपूरी येथे कार्तिक स्वामी मंदिरात वेगवेगळ्या आकारांच्या गुहा असून मल्लिकार्जुन, दत्तकुंड, विष्णूकुंड नावाची पाण्याची तीन कुंड आहेत. दुसऱ्या गुहेत शिवलिंग आहे. तिसऱ्या गुहेला विष्णू गुहा म्हणून प्रसिद्ध आहे. यात गगनगिरी महाराजांचे वास्तव्य होते. चौथी गुहा आकाराने लहान आहे. त्यात शिवलिंग स्थापित असून समोर नंदी आहे. पाचही गुफा कार्तिक स्वामी नावाने ओळखल्या जातात. यात या सर्व गुहांमध्ये महिलांना दर्शनासाठी मनाई आहे.

दर तीन वर्षांनी महिलांना दर्शनाचा योग प्राप्त होतो. राजपुरी या गावाला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे यावर्षी वेगळे महत्त्व आले असते, परंतु ग्रामस्थांच्या निर्णयाने कार्तिक स्वामी भक्तांना मुख्य करून महिलांना आता पुन्हा दर्शनासाठी तीन वर्ष वाट पाहावी लागणार आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: रेल्वे प्रवाशांसाठी बातमी! दिवाळीपूर्वी रेल्वेचा मोठा निर्णय; पुणे-हडपसरहून अमरावती, गाझीपूर, गोरखपूरसाठी विशेष गाड्या

अर्थबोध : प्राप्तिकर विभागाला तुमचे उत्पन्न कळू शकते का?

म्युच्युअल फंड : ‘कॉन्ट्रॅरियन इन्व्हेस्टिंग’मधील संधी

Maharashtra Weather : मॉन्सून परतीच्या वाटेवर! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; पुणे-सातारा-कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

करकायदा : ‘एमडीआर’वरील जीएसटी

SCROLL FOR NEXT