सातारा

Video पाहा : टाळेबंदी करू नका; हातावरचे पोट असलेल्यांनी जगायचे कसे?

राहूल लेंभे

पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव शहरी भागासोबतच ग्रामीण भागाची चिंता वाढवत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यावसायिकांवर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही संक्रांत आली आहे. सोमवारपासून नव्याने जाहीर झालेल्या वीक एंड लॉकडाउनमुळे व्यापारी धास्तावले असून, ऐन हंगामात अर्थचक्र ठप्प झाले आहे. हातावरचे पोट असलेल्यांनी जगायचे कसे? कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? पुढे काय होईल? अशी विवंचना सर्वांना पडली आहे. 

वर्षापूर्वी आलेल्या कोरोना संकटाने तब्बल सहा महिन्यांचा प्रदीर्घ लॉकडाउन झाला. त्याचा असंघटित क्षेत्रातील सर्वच घटकांवर विपरीत परिणाम झाला. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर काही महिने लॉकडाउन शिथिल झाला होता. आता कुठे कष्टकऱ्यांच्या हाताला काम मिळू लागले होते. चार पैसे हातात खुळखुळू लागल्याने बाजारपेठांत नवचैतन्य आले होते. व्यवसायाची बिघडलेली घडी पुन्हा रुळावर यायला लागली होती. अशातच रविवारी राज्य सरकारने मिनी लॉकडाउन जाहीर केला आणि सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले.

फोटो काढून फेसबुकवर मिरवण्याशिवाय नगराध्यक्षांनी काहीच काम केलेले नाही


वर्षभर मंदी असल्याने हातावरची शिल्लक कधीच संपली होती. बहुतांश जणांनी कर्ज काढून उद्योगधंदे सुरू ठेवलेत. मात्र, आता सलग दुसरे वर्ष आर्थिक फटका कसा सोसायचा? हाच खरा प्रश्न आहे. उन्हाळा असल्याने यात्रा, लग्नसराई तसेच पर्यटनाचा उद्योग बहरतो. त्यातून अनेकांना रोजगार मिळतो. या काळातील कमाईवर पावसाळा आणि हिवाळ्याचा खर्च निघतो. मात्र, लॉकडाउनमुळे अर्थहंगाम कोरडा जाणार असून, संपूर्ण वर्ष कसे काढायचे, याची काळजी अनेकांना सतावत आहे. निर्बंध कडक करा, कायदा मोडणाराला शासन करा, परंतु टाळेबंदी करू नका, अशी आर्त विनवणी प्रशासनाला केली जात आहे. 

कोरोनाला प्रतिबंध करताना शासनाने केलेला लॉकडाउन शिथिल करावा. कडक निर्बंध करून कायदेशीर कारवाई करा. पण, दुकानांची टाळेबंदी करू नका. अन्यथा आमच्यासारख्या नवीन व्यावसायिकांचे अतोनात नुकसान होईल.

-निखिल लेंभे, हॉटेल व्यावसायिक 


कोरोनाचे संकट जायचे नाव घेत नसल्याने व्यावसायिकांनी जगायचे कसे? लॉकडाउन काळात शासनाने आम्हाला आर्थिक मदत करावी.

-तेजस केंजळे, केटरिंग व्यावसायिक 
 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT