सातारा

बॅंक खाते उघडण्याचा प्रश्न मिटला; इच्छुकांना निवडणूक आयोगाचा दिलासा

प्रशांत घाडगे

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रचाराच्या खर्चाचा हिशोब दाखविण्यासाठी बॅंकांमध्ये नवीन खाते उघडणे बंधनकारक असते. यापूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रीयीकृत बॅंक व शेड्युल बॅंकांमध्ये खाते उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र, या बॅंकांमध्ये खाते उघडण्याबाबत सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी आयोगाकडे आल्याने सहकारी बॅंकेतही खाते उघडण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.
 
सातारा जिल्ह्यातील 879 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचाराचा खर्च दाखविण्यासाठी बॅंकांमध्ये खाते उघडून पासबुकची झेरॉक्‍स नामनिर्देशन पत्रासोबत जोडणे बंधनकारक असते. त्यामध्ये निवडणूक अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत ता. 30 डिसेंबरपर्यंत आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बॅंका व शेड्युल बॅंकांमध्ये नवीन खाते उघडून त्याचे पासबुक मिळेपर्यंत किमान आठवडा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांना मुदतीत अर्ज दाखल करताना अडचणी येण्याची शक्‍यता आहे. तसेच सहकारी बॅंकांमध्ये पूर्वीपासून खाते असल्यास एक ते दोन दिवसांत पासबुक मिळत असून नवीन खाते काढावयाचे असल्यास दोन ते तीन दिवसांत पासबुक मिळते. त्यामुळे उमेदवारांना अर्ज दाखल करणे सोईचे होणार आहे.

शिक्षकाने राबविलेल्या स्टोरी ऑन फोन उपक्रमास जागतिक पुरस्कार 
 
याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वतंत्र बॅंक खाते उघडण्यासाठी सहकारी बॅंकांचाही समावेश करत निवडणूक उमेदवारांना सहकार्य करण्याचे आदेश बॅंकांना दिले आहेत.

Edited By : Siddharth Latkar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nvidia Share Crash: एनव्हीडियाचा शेअर कोसळल्याने १३ भारतीय म्युच्युअल फंड अडचणीत? तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?

Marathwada Drought Relief : भीषण दुष्काळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू! 'या' मोठ्या धरणातून दोन्ही कालव्यांत पाणी सोडले, रब्बी पिकांना मिळणार जीवदान!

Job Alert: केंद्र सरकारच्या 'या' विभागात १,३९३ जागांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

Latest Marathi News Live Update: देश-विदेशातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT