सातारा

कऱ्हाडातील कार्वे, काले, उंडाळे, उंब्रजसह निम्मी गावे निवडणुकीत; तालुक्‍यात जोरदार रस्सीखेच

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड तालुक्‍यातील निम्म्या ग्रामपंचातींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासाठी जोरदार रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे गावोगावी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अर्ज भरण्यासाठी आठच दिवसांचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे पॅनेलप्रमुखांपुढे उमेदवार निवडीचे आव्हानच उभे राहिले आहे. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने त्यांना थांबवताना पुढाऱ्यांची कसरत होणार आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी गावोगावी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे. त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम 15 डिसेंबरपासून सुरू होत आहे. 23 डिसेंबरपासून 30 डिसेंबरपर्यंत (सुटीचे दिवस वगळून) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची कार्यवाही सुरू राहणार आहे. तालुक्‍यातील 220 ग्रामपंचायतींपैकी 104 ग्रामपंचायतींच्या म्हणजे तालुक्‍यातील निम्म्या गावांच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी गावोगावी राजकारण तापले आहे. तालुक्‍यातील कार्वे, काले, शेणोली, शेरे, उंडाळे, वहागाव, विंग, बनवडी, वाठार, घोणशी, गोवारे, कोळे, ओंड, पाल, शिरवडे, वारुंजी, येरवळे, गोळेश्वर, नांदगाव, सैदापूर, जखीणवाडी, कोपर्डे हवेली, तांबवे, उंब्रज या मोठ्या गावांसह अन्य गावांमध्ये दुरंगी व तिरंगी लढती होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी पॅनेलप्रमुख व इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

मध्यंतरी झालेल्या वॉर्ड रचनेनुसार वॉर्डनिहाय पुरुष-महिला असे कोणते उमेदवार असणार, याची निश्‍चिती झाली आहे. त्यामुळे गावातील पॅनेलप्रमुख व पुढाऱ्यांनी सध्या उमेदवार शोधण्यासाठीची मोहीम हाती घेतली आहे. काही ठिकाणी अनेक जण इच्छुक आहेत. तेथे उमेदवारी देताना पॅनेलप्रमुखांनी आणि पक्षप्रमुखांना जिकिरीचे होणार आहे. उमेदवारी मिळवण्यासाठीही अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र, उमेदवार निवडीनंतर अनेक इच्छुकांच्या नाराजीच्या रोषाला पुढाऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे. 

अनेक इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी

 ग्रामपंचायतीचे सरपंच होण्यासाठी अनेकांनी वर्षभरापासूनच गावात फिल्डिंग लावली होती. मात्र, निवडणुकीनंतरच गावातील सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फिरण्याची शक्‍यता आहे. पहिल्यांदाच सरपंचपदाच्या आरक्षणाविना निवडणूक होत आहे. त्यामुळे "कहीं खुशी, कहीं गम' अशीच स्थिती सध्या आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT