सातारा

कोविड योद्‌ध्यांच्या गौरवार्थ माजी सैनिकाची सातारा ते रहिमतपूर धाव

दिलीपकुमार चिंचकर

सातारा ः प्रजासत्ताकदिनी कोविड योद्‌ध्यांचा गौरव करण्यासह समस्त नागरिकांच्या तंदुरुस्तीबाबत प्रबोधन करण्यासाठी एका माजी सैनिकाने आपल्या 11 वर्षांच्या मुलासमवेत येथील पोवई नाक्‍यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून धावत जाऊन सायगाव (धामणेर, ता. कोरेगाव) येथे ग्रामपंचायतीचे ध्वजवंदन केले. माजी सैनिक नीलेश गोगावले यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

श्री. गोगावले यांना सामाजिक कार्याची आवड असून, ते नेहमीच समाजाची बांधिलकी जपत असतात. तसेच आरोग्य आणि तंदुरुस्तीबाबत ते सतत जागरुक असतात. नागरिकांनीही नेहमी तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायामाकडे लक्ष द्यावे, आपले आरोग्य जपावे याबाबत ते प्रबोधन करतात. नुकतेच सर्वांवर कोरोनाचे मोठे संकट ओढवले होते. त्या काळात आपल्या स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अनेक आशा वर्कर, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना रुग्णांची आणि समस्त नागरिकांची सेवा केली. त्या कोरोना योद्‌ध्यांचा सन्मान करण्यासाठी श्री. गोगावले यांनी प्रजासत्ताकदिनी सातारा ते रहिमतपूर असा धावण्याचा उपक्रम राबविण्याचे ठरविले.

येथील पोवई नाक्‍यावरून सकाळी सहा वाजता त्यांनी धावण्यास प्रारंभ केला. त्यांच्यासमवेत त्यांचा 11 वर्षांचा मुलगा आदिनन सायकलवरून रपेट करत होता. नगरसेवक अल्लाउद्दीन शेख यांनी शुभेच्छा दिल्या. मजल दरमजल करत ते सायगाव येथे पोचले. तेथे ग्रामपंचायतीचे ध्वजवंदन केले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात श्री. गोगावले यांनी तेथील आशा वर्कर, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. श्री. गोगावले यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थ आणि जिल्ह्यातील मान्यवरांनी कौतुक केले. तसेच ग्रामस्थांनी श्री. गोगावले यांचा सत्कारही केला.

कऱ्हाडात खुल्या प्रवर्गाचे 120 गावांत आरक्षण; शुक्रवारी होणार सरपंचपदाची सोडत!

राष्ट्रपतींच्या गिफ्टने खासदार श्रीनिवास पाटील गेले भारावून

सातारा : कुळ कायद्यातील अवैध विक्री झालेल्या जमिनी होणार सरकारजमा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT