Sonawade primary health center Family planning surgery esakal
सातारा

कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करताना चुकून दुसरीकडंच पडलं छिद्र, डॉक्टरांनी लपवली चूक; 26 टाके अन् महिलेला असह्य वेदना..

शस्त्रक्रिया करताना शस्त्रक्रियेस आवश्यक त्या प्रमाणात भूल देवून सदर शस्त्रक्रियेस प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.

अरुण गुरव

सदर शस्त्रक्रियेस मर्यादेपेक्षा अधिकचा विलंब झाल्याने सदर महिलेला दिलेली भूल पूर्णपणे उतरली. त्यामुळे तिला असहाय्य वेदना होऊ लागल्या.

मोरगिरी : पाटण तालुक्यातील सोनवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात (Sonawade Primary Health Center) चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया विरोधात पाटण प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. सदर प्रकरणी जिल्हा स्तरावरील जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय बैठकीचे आयोजन करुन सदर प्रकरणी चौकशी करून समितीच्या निर्णायानुसार, संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने (Health Department) आंदोलकांना दिले होते. त्यानुसार आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

मात्र, पंधरा दिवस झाले तरी संबंधितांवर काय कारवाई झाली, याचा थांगपत्ता लागत नाही. तर, सातारा जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने संबंधित महिलेला (Women) न्याय मिळणार कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाटण तालुक्यातील सोनवडे-शिंदेवाडी या गावातील शशिकांत रामचंद्र पाटील यांची पत्नी सौ. गौतमी शशिकांत पाटील या महिलेची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्या करिता दि. २० मे रोजी सोनवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले‌. त्यानुसार त्यांच्यावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया करताना शस्त्रक्रियेस आवश्यक त्या प्रमाणात भूल देवून सदर शस्त्रक्रियेस प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.

परंतु, सदर शस्त्रक्रियेस मर्यादेपेक्षा अधिकचा विलंब झाल्याने सदर महिलेला दिलेली भूल पूर्णपणे उतरली. त्यामुळे तिला असहाय्य वेदना होऊ लागल्या. सदर प्रकार संबंधित ऑपरेशन टीमच्या लक्षात येताच या टीमने अक्षरशः जबरदस्तीने ऑपरेशन करण्यास सुरूवात केली. जबरदस्तीने दीड ते दोन तास चालू असणारी शस्त्रक्रिया संपवून सदर महिलेला जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. दाखल करून वेदनाशामक डोस दिल्याने तिला होत असणाऱ्या मरण यातनेतून तात्पुरता आराम मिळाला. या जबरदस्तीच्या शस्त्रक्रियेमुळे तिच्या मोठ्या आताड्याला इजा झाली व त्यातील घाण पोटामध्येच पसरल्याने तिच्या पोटात इन्फेक्शन झाले व तिचा जीव धोक्यात आल्याचे प्रकरण घडले होते.

Sonawade primary health center

घडलेल्या प्रकाराविरोधात न्याय मिळण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शुभम उबाळे यांचा आंदोलनात्मक पवित्रा घेऊन २४ जूनला २०२४ पासून पाटण पंचायत धरणे आंदोलनास सुरूवात केली‌. सदर प्रकरणी जिल्हा स्तरावरील जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय बैठकीचे आयोजन करुन सदर प्रकरणी चौकशी करून समितीच्या निर्णायानुसार संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आंदोलकांना दिले होते.

त्यानुसार आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, पंधरा दिवस झाले तरी संबंधितावर काय कारवाई झाली यांचा थांगपत्ता लागत नाही. सातारा जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने संबंधित महिलेला न्याय मिळणार कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रहार संघटनेच्या वतीने डॉ. नागेश ननावरे, डॉ. अभिषेक डुबल व संबंधित नर्स यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे. त्यांचे निलंबन करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी. गौतमी पाटील याचा झालेला खर्च शासनाकडून देण्यात यावा व यापुढेही उपचाराच्या खर्चाची जबाबदारी संबंधित दोन डॉक्टर यांच्यावर देण्यात यावी. तसेच संबंधित महिलेची जीवितहानी झाल्यास डॉक्टरांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, ही मागणी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करुनही संबंधितावर शासनाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

''आरोग्य अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासू''

सोनवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरच्या निष्काळाजीपणामुळे गौतमी पाटील यांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाली आहे. या विरोधात जिल्हा आरोग्य विभाग संबंधित डॉक्टर यांना पाठीशी घालत आहेत. याबाबत आमदार बच्चूभाऊ कडू यांनी फोन करुन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना कारवाईबाबत तंबी दिलेली आहे. आठ दिवसांत कारवाई झाली नाही, तर प्रहार संघटनेच्या वतीने आरोग्य अधिकारीच्या तोंडाला काळे फासू.

-शुभम उबाळे, तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष पाटण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT