Goat Project  sakal
सातारा

Goat Project : मेंढ्यांसाठीच्‍या बडदास्‍तीने हरखले इटलीचे पाहुणे;विठ्ठलवाडीच्या शेळी प्रकल्पास भेट

शेळ्या-मेंढ्यांच्या ठेवलेल्या अद्ययावत नोंदी, त्यांच्या बेड, डायनिंग रूम या सुविधा, तसेच प्रकल्पातील सशक्त आफ्रिकन बोअर शेळ्या पाहून परदेशी पाहुणे खूष झाले.

सकाळ वृत्तसेवा

वाई शहर : शेळ्या-मेंढ्यांच्या ठेवलेल्या अद्ययावत नोंदी, त्यांच्या बेड, डायनिंग रूम या सुविधा, तसेच प्रकल्पातील सशक्त आफ्रिकन बोअर शेळ्या पाहून परदेशी पाहुणे खूष झाले. विठ्ठलवाडी-कवठे (ता. वाई) येथील सुंबरान गोट फार्मला इटलीतील डॉ. गुइडो लोरिया, डॉ. रॉबर्टो पुलेओ व नागपूरच्या महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. एन. व्ही. कुरकुरे यांनी भेट दिली.

प्रकल्पातील बेडरूम, डायनिंग, शेळ्या-बकऱ्यांविषयक ठेवलेल्या अद्ययावत नोंदी पाहून इटलीपेक्षाही अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला.नवी सुशिक्षित पिढी पारंपरिक शेळी- मेंढी पालन करण्यास उत्सुक नाही. वाढते शहरीकरण, रासायनिक खते, तण व कीटकनाशके यांचा वापर वाढल्याने घटलेले चाऱ्याचे क्षेत्र, असंघटित बाजारपेठेमुळे पारंपरिक शेळी-मेंढी उत्पादकांचे प्रमाण वेगाने कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

इटलीमध्ये दूध उत्पादनासाठी प्राधान्याने शेळीपालन केले जाते. शेळीच्या दुधापासून चीज निर्मिती केली जाते. या पौष्टिक, चविष्ट चीजला जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इटलीतील शेळ्या दिवसातून जवळपास दोन लिटर दूध देतात, हेही त्यांनी सांगितले. शारीरिक श्रमाच्या या व्यवसायात येण्यास इटलीतील नवी पिढीही उत्सुक नसल्याचे ते म्हणाले. शेळ्या मेंढ्यांच्या आजाराबाबतच्या संशोधनात शिरवळच्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. विठ्ठल धायगुडे विशेष प्रयत्नशील असल्याचे डॉ. कुरकुरे यांनी या वेळी सांगितले. दिलीप चव्हाण यांनी स्वागत केले. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकल्पाची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira-Bhayandar: धक्कादायक! डब्यात मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला ५० रुपयांचा दंड, मनसे आक्रमक

Gokul Election 2026 : 'अदृश्य शक्ती कोण? नाव सांगा, मग बोलते'; शौमिका महाडिक यांचे 'गोकुळ'च्या रणधुमाळीत थेट आव्हान, भाजपच्या सर्व उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत भरले अर्ज

Asian Games MMA : अवघ्या ७०० ग्रॅमने सुवर्णपदकाची संधी हुकली!; अाशियाई क्रीडा स्पर्धा ; सुचिका तारियालला मिक्स्ड मार्शल आर्ट्‌समध्ये ब्राँझपदक

Marathi News Live Updates : अमित शाह आज एएनटीएफ परिषदेचे उद्घाटन करणार

फुलांची आरास अन् गणपतीचं गोंडस रूप! पुण्यात या ठिकाणी आहे नाना पाटेकरांचा गणपती; राहुल देशपांडेंनी शेअर केला फोटो

SCROLL FOR NEXT